ENG vs NED: भारताच्या सामन्याची आम्ही वाट...; पराभवानंतर नेदरलँड्सच्या कर्णधाराने भरला हुंकार

ENG vs NED: पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये इंग्लंड विरूद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामना रंगला होता. या सामन्यात अखेरीस नेदरलँड्सला 160 धावांनी दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. पराभवानंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड्स खूपच निराश दिसत होता

सुरभि जगदीश | Updated: Nov 9, 2023, 07:54 AM IST
ENG vs NED: भारताच्या सामन्याची आम्ही वाट...; पराभवानंतर नेदरलँड्सच्या कर्णधाराने भरला हुंकार title=

ENG vs NED: बुधवारी वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्स विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना रंगला होता. अखेरीस या सामन्यात इंग्लंडने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दुसरा विजयाची नोंद केली आहे. इंग्लंडने या सामन्याच 160 रन्सने नेदरलँड्सचा पराभव केला आहे. दरम्यान या सामन्यातनंतर नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नेमक्या कोणत्या चुका केल्या त्याबाबत माहिती दिलीये. 

पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये इंग्लंड विरूद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामना रंगला होता. या सामन्यात अखेरीस नेदरलँड्सला 160 धावांनी दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. पराभवानंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड्स खूपच निराश दिसत होता. भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी त्याने मोठं विधान केलं आहे. 

पराभवानंतर या म्हणाला स्कॉट एडवर्ड्स?

या पराभवानंतर स्कॉट एडवर्ड्स म्हणाला की, आम्ही गोलंदाजीने चांगली सुरुवात केली नाही गोलंदाजांनी त्यांना रोखण्याचा चांगला प्रयत्न केला, ही विकेट खूप चांगली होती. आम्ही त्यांना 43व्या ओव्हरपर्यंत रोखून ठेवलं. कदाचित आम्ही काही वेगळ्या योजनांचा प्रयत्न करू शकलो असतो."
 
आम्ही याबाबतच चर्चा करू. यावेळी आम्ही अजून काय चांगल्या पद्धतीने करू शकतो याकडे लक्ष देऊ. फक्त ते दीर्घकाळ करावे लागेल. आमचा पुढचा सामना भारताविरुद्ध बंगळुरूमध्ये होणार आहे. आमची त्याची वाट पाहतोय.

इंग्लंडचा नेदरलँड्सवर मोठा विजय

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडच्या टीमने 9 विकेट्स गमावून 339 रन्स केले. यावेळी टीमकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक रन्स केले. त्याने 84 बॉल्समध्ये 108 रन्सचं योगदान दिलं. तर डेव्हिड मलानने 74 बॉल्समध्ये 87 रन्सची शानदार खेळी केली. ख्रिस वोक्सनेही 45 बॉल्समध्ये 51 रन्स केले. 

इंग्लंडने दिलेल्या 340 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडची टीम 37.2 ओव्हर्समध्ये 179 रन्सवर गारद झाली. नेदरलँड्सकडून तेजा नदामुनुरूने 41 रन्सची खेळी खेळली. या सामन्यात स्क्वॉट एडवर्ड्सनेही फलंदाजीने निराश केलं. त्याने 42 बॉल्समध्ये 38 रन्सची खेळी केली. अखेर मोईन अलीने त्याला माघारी धाडलं.