Robin Uthappa Video : जेव्हा जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान (India Champions) मैदानात आमनेसामने येतात तेव्हा क्रिकेटप्रेमींसह सर्वांचा जल्लोष शिगेला असतो. बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स लीगच्या अंतिम फेरीतही हा उत्साह दिसून आला. पाकिस्तान चॅम्पियन्सचा 5 गडी राखून पराभव करून लिजेंड्सच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद भारताने आपल्या नावावर केलं. यासोबत रॉबिन उथप्पाचा 'त्या' कृतीमुळे भारतीयांची छाती अभिमानाने मोठी झाली. (WCL 2024 Final robin uthappa helps injury misbah ul haq during ind c vs pak c match video viral)
सामन्यादरम्यान एक वेळ अशी आली जेव्हा पाकिस्तानचा बॅट्समॅन रन्स वाढविण्यासाठी प्रयत्न करत असताना जखमी झाला. मिस्बाह उल हक (Misbah ul haq) एक रन घेण्यासाठी धावला अन् त्याच्या मांडीत क्रॅम्प आला. तो वेदनेने ओरडू असताना भारताचा सलामीवीर रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) त्याला आधार दिला. त्याला आपल्या खांद्याचा आधार देत मैदानातून बाहेर जाण्यास मदत केली. उथप्पाचा हा व्हिडीओ पाहून भारतीयांना आनंद होतोय.
Spirit of Cricket moment in Birmingham #IndvPakonFanCode #WCLonFanCode pic.twitter.com/l3iBarnGwU
— FanCode (@FanCode) July 13, 2024
खरं तर, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक याला 15 चेंडूत 18 धावा केल्यानंतर दुखापत झाल्याने मैदान सोडाव लागलं.
अंतिम सामना भारताने 5 विकेट्स राखून जिंकला. पाकिस्तानने दिलेल्या 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 5 चेंडू बाकी असताना 159 धावा करत अंतिम फेरीत विजय मिळवला. इंडिया चॅम्पियन्ससाठी अंबाती रायडूने अर्धशतक झळकावले तर युसूफ पठाणने 16 चेंडूत 30 धावा केल्या. गुरकीरत सिंग मान 34 धावा करून बाद झाला तर कर्णधार युवराज सिंग 15 धावा करून नाबाद परतला.
ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले हे खेळाडूंनी ही मॅच खेळली. भारतीय संघात युवराज सिंग, इरफान पठाण, उथप्पा, हरभजन सिंग यांसारखे खेळाडू होते, तर पाकिस्तान संघात युनूस खान, मिसबाह, शोएब मलिक आणि शाहिद आफ्रिदी या दिग्गजांचा समावेश होता. या लीगमध्ये सहा संघ सहभागी झाले होते.