VIDEO : 6,6,6,6,6... Rinku Singh ठरला KKR च्या विजयाचा हिरो; पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार!

Last Triller Over Of GT vs KKR: अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील रोमांचक सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात (Last Thriller Over) पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

सौरभ तळेकर | Updated: Apr 9, 2023, 09:06 PM IST
VIDEO : 6,6,6,6,6... Rinku Singh ठरला KKR च्या विजयाचा हिरो; पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार! title=
Rinku Singh, GT vs KKR

Rinku Singh, GT vs KKR : अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील रोमांचक सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे. शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी 29 धावांची गरज होती. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात (Last Thriller Over) पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. (Watch Last Thriller Over of GT vs KKR Rinku Singh hit five sixes in over video) 

19.1 -  Yash Dayal to Umesh Yadav : पहिल्या बॉलवर उमेश यादवने 1 रन घेत रिंकूला स्टाईक दिली.

19.2 -  Yash Dayal to Rinku Singh : यशने टाकलेला आयसाईड ऑफ चेंडू रिंकूने एक्ट्रा कवरच्या वरून टोलावला. या ओव्हरचा हा पहिला सिक्स होता.

19.3 -  Yash Dayal to Rinku Singh : तिसरा चेंडू देखील रिंकूने फुल टॉस केला. त्यावेळी रिंकूने बॅकवर्ड स्वेअर लेगच्या दिशेने सिक्स खेचला.

19.4 -  Yash Dayal to Rinku Singh : चौथा चेंडू यशने पुन्हा एकदा फुल टॉस केला. त्यावर लॉग ऑफच्या दिशेने टोलावला.

19.5 -  Yash Dayal to Rinku Singh : पाचव्या चेंडूवर यशने स्लोवर लेंथ बॉल टाकला. त्यावर रिंकूने स्विप कवरला बॉल खेचला. आता सामना जिंकण्यासाठी केकेआरला 4 धावांची गरज होती.

19.6 -  Yash Dayal to Rinku Singh : अखेरच्या चेंडूवर काय होणार अशी धाकधूक सुरू असताना रिंकूने स्लोवर शॉर्ट बॉलवर फ्लॉट सिक्स खेचला.

पाहा Video - 

दरम्यान, रिंकूने 21 चेंडूत नाबाद 48 धावा चोपल्या. आयपीएलमध्ये एका षटकात पाच षटकार मारण्याच्या विक्रमासह रिंकू सिंगने 20 व्या षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला आहे. एकट्या व्यंकटेशाही चाळीस चेंडूंमध्ये 83 धावांची धमाकेदार खेळी केली मात्र, राशीदच्या करामती ओव्हरमुळे सामना गुजरातच्या पारड्यात गेला होता. त्यानंतर रिंकूने चमत्कार करून दाखवला.