ये तूने क्या कियाsss... KL Rahul ची एक चूक अन् टीम इंडियाचा 'नागिण डान्स' हुकला!

KL Rahul drop catch of Mehidy Hasan: सामन्यात भारताकडून अनेक चुका झाल्या. त्यात फिल्डिंग करताना खेळाडूंनी भरपूर चुका केल्याचं दिसून आलं. त्यात सर्वात मोठी चूक केली ती उपकर्णधार के एल राहूलने...

Updated: Dec 4, 2022, 08:13 PM IST
ये तूने क्या कियाsss... KL Rahul ची एक चूक अन् टीम इंडियाचा 'नागिण डान्स' हुकला! title=
KL Rahul drop catch of Mehidy Hasan

IND vs BAN 1st ODI: भारत आणि बांग्लादेश (india vs bangladesh) यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना (IND vs BAN 1st ODI) रविवारी पार पडला. ढाक्यातील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांग्लादेशने भारताला 1 गडी राखून (Bangladesh Beat India) पराभव केला. अटीतटीच्या सामन्यात भारताला फक्त 1 विकेटची गरज होती. मात्र, बांग्लादेशच्या मेहदी हसन (Mehidy Hasan) आणि मुस्ताफिजूर रेहमानने (Mustafizur Rahman) यांनी मैदान सोडलं नाही आणि बांग्लादेशला पहिला विजय मिळवून दिला.

मेहदी हसन आणि मुस्ताफिजूर रेहमानने 10व्या विकेटसाठी नाबाद 51 धावांच्या भागीदारी करत भारताच्या तोंडातील विजय हिसकावून घेतला. या सामन्यात भारताकडून अनेक चुका झाल्या. त्यात फिल्डिंग करताना खेळाडूंनी भरपूर चुका केल्याचं दिसून आलं. त्यात सर्वात मोठी चूक केली ती उपकर्णधार के एल राहूलने... (Watch KL Rahuls shocking drop catch of Mehidy Hasan that cost India 1st ODI against Bangladesh Rohit Sharma furious)

नेमकं काय घडलं?

के एल राहूलने (KL Rahul) अखेरचा फलंदाज असलेल्या मेहदी हसनचा कॅच (KL Rahul drop catch of Mehidy Hasan) सोडला. ही घटना घडली बांग्लादेश फलंदाजी करत असताना 43 व्या ओव्हरमध्ये...  शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मेहदीने आकाशात बॉल उडवला. त्यावेळी विकेटकिपिंग करत असलेल्या राहुलने बॉलच्या दिशेने धाव घेतली.

पाहा Video -

दरम्यान, थर्ड मॅनच्या दिशेने गेलेला राहुल हा कॅच सहज पकडेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, झालं उलटं... साधा सोप्पा कॅच राहुलने ड्रॉप केला. त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील चांगलाच भडकल्याचं दिसून आलं. राोहित शर्मा अक्षरश: रागाने लालबुंद झाल्याचं दिसून आलंय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान (Viral Video) व्हायरल होताना दिसतोय.