Suryakumar Supla Shot: सूर्याच्या 'सुपला शॉट' पाहून बॉलर आवाक्... एकच मारला पण सॉलिड मारला; पाहा Video

Suryakumar Yadav Supla Shot Video: पहिल्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने  तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारतीय फिरकीपुढे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याचं दिसून आलंय.

सौरभ तळेकर | Updated: Jul 28, 2023, 12:06 AM IST
Suryakumar Supla Shot: सूर्याच्या 'सुपला शॉट' पाहून बॉलर आवाक्... एकच मारला पण सॉलिड मारला; पाहा Video title=
IND vs WI, Suryakumar Yadav, supla shot,

Jayden Seales reaction on supla shot: भारत आणि वेस्ट इंडिज संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील (IND vs WI 1st ODI) पहिला सामना केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिज 5 विकेट्स राखून विजय (India Beat West Indies by 5 Wickets) मिळवला आहे. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारतीय फिरकीपुढे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याचं दिसून आलंय.

भारताकडून सलामीला आलेल्या ईशान किशनने अर्धशतक झळकावलं. ईशानने 46 चेंडूत 52 धावा केल्या. त्यात त्याने 7 फोर आणि एक गगनचुंबी षटकार खेचला. तर प्रथम गोलंदाजी करताना लेग स्पिनर्सने कमाल केली. कुलदीप यादवने 3 ओव्हरमध्ये 6 धावा देत 4 विकेट घेतल्या. तर रविंद्र जडेजाने 6 ओव्हरमध्ये 37 धावा देत 3 विकेट घेतल्या. मात्र, या सामन्यात चर्चेत राहिला तो सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) फेमस असा सुपला शॉट (Supla Shot)...

आणखी वाचा - IND vs WI: वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाचा प्रयोग फसला, इवलुश्या धावसंख्येसमोर रडत रडत विजय!

वेस्ट इंडिजविरुद्ध सूर्यकुमार यादवने फक्त 19 धावांची खेळी केली. त्यात त्याने 3 फोर आणि 1 सिक्स मारला. या खेळीत सूर्यकुमारने एक सुपला शॉट मारून सिक्स खेचला. सूर्याचा हा शॉट पाहून बॉलर जयडेन सील्स देखील चकित झाल्याचं दिसून आलं. बॉऊंसर आलेला हा बॉल सूर्याने थेट स्टेडियम बाहेर उचलला. बॉलरच्या रिअॅक्शनचा व्हिडीओ (Suryakumar Yadav Supla Shot Video) सध्या ट्रेंडिगमध्ये असल्याचं दिसून येतंय.

पाहा Video

दरम्यान, हार्दिक पांड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूरने 1-1 विकेट घेतल्या आहेत. फलंदाजीमध्ये वर्ल्ड कप तोंडावर असताना प्रयोग करण्यात आल्याचं दिसून आलं. सलामीसाठी शुभमन गिल आणि इशान किशनची जोडी पाठवण्यात आली होती. तर कॅप्टन रोहित शर्मा 7 नंबरला खेळण्यासाठी उतरला. पोस्ट मॅचमध्ये बोलताना आपण पहिल्या वनडे सामन्यात 7 व्या क्रमांकावर खेळलो होतो, अशी आठवण देखील रोहितने जागी केली आहे.