हे शक्यच नाही, वॉर्नर Out होताच लेकिला रडू कोसळलं आणि... पाहा व्हिडीओ

बाबा आऊट झाल्याचं लेकीला दु:ख, स्टेडियममध्येच रडूरडून हाल, पाहा व्हिडीओ

Updated: Apr 17, 2022, 12:14 PM IST
हे शक्यच नाही, वॉर्नर Out होताच लेकिला रडू कोसळलं आणि... पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : दिल्ली विरुद्ध बंगळुरू खूप अटीतटीचा सामना झाला. बंगळुरूने दिल्लीवर 16 धावांनी विजय मिळवला. या मॅचमध्ये दिल्लीला बंगळुरूने 190 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्ली टीम केवळ 173 धावा करण्यात यशस्वी ठरली. 

या मॅचमध्ये विशेष लक्ष डेव्हिड वॉर्नरच्या लेकींनी वेधलं. डेव्हिड वॉर्नर आणि टीमची मॅच पाहण्यासाठी त्याच्या मुली स्टेडियममध्ये आल्या होत्या. वॉर्नरने 38 बॉलमध्ये 66 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 5 षटकार ठोकले. 

वॉर्नर आऊट होताच मुलींचा हिरमोड झाला आणि त्यांना रडू कोसळलं. वानिंदु हसरंगाने वॉर्नरची विकेट काढली. बाबा आऊट झाल्यानंतर मुलीच्या रडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वॉर्नरची सगळ्यात छोटी मुलगी तो आऊट झाल्यानंतर खूप जास्त नाराज आणि दु:खी झाली. 

बंगळुरूने चौथा सामना जिंकला तर दिल्लीने यंदाच्या हंगामातील तिसरा सामना गमवला आहे. 16 धावांनी बंगळुरू टीमने विजय मिळवला आहे. 190 धावांचं लक्ष्य बंगळुरूने दिल्लीसमोर ठेवलं मात्र याचा पाठलाग करताना दिल्ली टीमला अपयश आलं. 173 धावा करून दिल्लीला सामना गमवावा लागला.