मुंबई : आशिया कप 2022 च्या सुपर 4 टप्प्यातील शेवटचा सामना शुक्रवारी 9 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये यजमान श्रीलंकेने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. दरम्यान रविवारी 11 सप्टेंबर रोजी या दोन टीममध्ये आशिया कपचा अंतिम सामनाही होणार आहे. श्रीलंका-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाच्या एका पाकिस्तानी फॅन मुलीचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात एक पाकिस्तानी फॅन श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाच्या सेलिब्रेशनची कॉपी करताना दिसली. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. चाहत्यांनाही हा व्हिडिओ खूप आवडला आहे.
वानिंदू हसरंगाने पाकिस्तानविरुद्ध अष्टपैलू कामगिरी केली आणि टीमला सामना जिंकून दिला. त्यामुळे त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कारही देण्यात आला. गोलंदाजी करताना हसरंगाने 4 ओव्हरमध्ये 21 रन्स देत 3 विकेट्स घेतले. त्याचवेळी त्याने फलंदाजीत अवघ्या 3 बॉल्समध्ये 10 रन्स केले.
— Nishant Rawat (@Nishant92787730) September 9, 2022
आशिया कपच्या फायनल अगोदर सुपर 4 मधील शेवटच्या सामन्यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला. श्रीलंकेने टॉस जिंकत पाकिस्तानला बॅटींगसाठी आमंत्रित केलं होतं, मात्र पाकिस्तानचा संघ श्रीलंकेसमोर अवघ्या 121 धावात ऑल आऊट झाला. यामध्ये बाबर आझम 30 आणि मोहम्मद नवाझ यांनी सर्वाधिक धावा केल्या होत्या.
श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर श्रीलंका फलंदाजीला आल्यावर पाकिस्तानने सुरूवातीलाच कुशल मेंडिस 0, गुणतलिका 0 आणि धनंजय डिसिल्वा 9 धावांवर बाद झाले. दुसरीकडे सलामीवीर निसांकाने एक बाजू लावून धरली होती. निसांकाने नाबाद 55 धावांची खेळी केली. हसरंगाने तीन चेंडूंमध्ये 10 धावा करत शेवटच्या बॉलवर चौकार मारत विजयावर शिक्कमोर्तब केलं.