विराटला सोडा, माजी कर्णधार Ajinkya Rahane चा डबल धमाका पाहिलात का?

अजिंक्य रहाणेला दुखापतीमुळे भारतीय टीममधून बाहेर ठेवलं होतं.

Updated: Sep 10, 2022, 12:34 PM IST
विराटला सोडा, माजी कर्णधार Ajinkya Rahane चा डबल धमाका पाहिलात का? title=

मुंबई : भारताची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफी सुरू झालीये. गुरुवारपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवले जात आहेत. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम विभागाची ईशान्य विभागाशी स्पर्धा होणार आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळावर परिणाम झाला, मात्र दुसऱ्या दिवशी पश्चिम विभागाच्या फलंदाजांनीच वादळ निर्माण केलं. सलामीवीर पृथ्वी शॉने शतक झळकावलं. तर मुख्य म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणे याने दमदार द्विशतक झळकावलं आहे.

रहाणेची उत्तम कामगिरी

अजिंक्य रहाणेला दुखापतीमुळे भारतीय टीममधून बाहेर ठेवलं होतं. मात्र त्याच्या खेळाच्या कामगिरीमुळे त्याला वगळलं असल्याचं म्हटलं गेलं. शिवाय त्याची आयपीएलमधील कामगिरीही विशेष नव्हती. मात्र आता दुलीप ट्रॉफीमध्ये कर्णधार असताना त्याने द्विशतक झळकावलंय.

दुसऱ्या दिवशी, रहाणे स्टंपपर्यंत 264 चेंडूत 207 रन्स खेळत होता. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात रहाणेने 18 फोर आणि 6 सिक्स मारलेत. त्याचवेळी जैस्वालने 321 चेंडूत 228 रन्सची खेळी केली. पृथ्वी शॉने 121 चेंडूत 113 रन्सने करून आऊट झाला. 

'मी भविष्याचा विचार करत नाही'

दुलीप ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी अजिंक्य रहाणे पीटीआयशी बोलताना म्हणाला, 'माझा माझ्या खेळावर विश्वास आहे. सध्या माझं लक्ष दुलीप ट्रॉफीवर आहे आणि पश्चिम विभागीय टीमसाठी चांगली कामगिरी करा आणि भविष्यात काय होतं ते आम्ही पाहू. 
तो पुढे म्हणाला, दुखापतीतून पुनरागमन करणं म्हणजे एका वेळी एकाच खेळावर लक्ष केंद्रित करणं आणि भविष्याकडे पाहण्याऐवजी या क्षणी काय हाती आहे ते पाहणं आहे. मी चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.