दुबई : ICC T20 world cup 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) इतिहास रचला आहे.
श्रीलंकेचा पराभव
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने (Sri Lanka) निर्धारित 20 षटकांत 10 गडी गमावून 142 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) 19.5 षटकांत 6 विकेट्स गमावून 146 धावा पूर्ण केल्या आणि सामना 4 विकेटने जिंकला.
वानिंदू हसरंगाची हॅटट्रिक
श्रीलंकेचा या सामन्यात जरी पराभव झाला असला तरी त्यांचा गोलंदाज वानिंदू हसरंगाने हॅट्ट्रिक करून खळबळ उडवून दिली. त्याने एडन मार्कराम, टेम्बा बावुमा आणि ड्वेन प्रिटोरियस यांना सलग 3 चेंडूत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
T20 विश्वचषकातील तिसरी हॅट्ट्रिक
पुरुषांच्या T20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) हा जगातील तिसरा आणि श्रीलंकेचा पहिला गोलंदाज आहे. हसरंगापूर्वी ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली आणि आयर्लंडचा कर्टिस कॅम्फर यांनीही हा पराक्रम केला आहे. कॅम्परने या T20 विश्वचषकात सलग चार चेंडूत विकेट्स घेतल्या आहेत.
वानिंदू हसरंगा IPL 2021 मध्ये विराट कोहलीच्या आरसीबी संघाकडून खेळताना दिसला होता. त्याला या मोसमात केवळ 2 सामने खेळण्याची संधी मिळाली.