मुलीला हाती घेण्याचा ही नाही मिळाला आनंद, अंत्यसंस्कार करून थेट मैदानात परतला आणि झळकावलं शतक

Ranji Trophy 2022 : आपल्या जवळच्या व्यक्तीला गमवल्यानंतर  मैदानावर परतणं आणि शानदार शतक झळकावणं हे सोपं नव्हतं. पण त्याने केलेली कामगिरी ही नक्कीच कौतुकास्पद होती.

Updated: Feb 26, 2022, 05:06 PM IST
मुलीला हाती घेण्याचा ही नाही मिळाला आनंद, अंत्यसंस्कार करून थेट मैदानात परतला आणि झळकावलं शतक title=

Ranji Trophy 2022 : रणजी ट्रॉफी 2022 दरम्यान बडोदा आणि चंदीगड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात बडोदा (Baroda Cricket Team) फलंदाज विष्णू सोलंकीने आपल्या फलंदाजीने सगळ्यांनाच अचंबित केले. त्याच्या 104 धावांच्या शानदार शतकामुळे बडोद्याने पहिल्या डावात 517 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर त्याच्या खेळीचे खूप कौतुक होत आहे. या कौतुकामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे नुकतेच त्यांच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे.

वडोदराकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विष्णू सोलंकीने 165 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 104 धावा करत शानदार शतक ही झळकावले. मात्र, यावेळी त्यांनी कोणताही उत्सव साजरा केला नाही. कदाचित त्याचं मन अजूनही त्या मुलीकडेच आहे. काही दिवसांपूर्वी चिमुकलीचा मृत्यू झाला होता.

हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, 11 फेब्रुवारीच्या मध्यरात्री सोलंकीला मुलीच्या जन्माची बातमी मिळाली, मात्र 24 तासांतच त्याच्या मुलीचं निधन झालं. त्यावेळी तो संघासोबत भुवनेश्वरमध्ये होता. आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी तो वडोदरा येथे गेला आणि 3 दिवसात परत संघात सामील झाला.

वडिलांची जबाबदारी पार पाडल्यानंतर सोलंकीने दुसरी जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय घेत मैदानात पुनरागमन करत शानदार शतक झळकावले. यानंतर सर्वजण सोलंकीच्या या कामगिरीला सलाम करत आहेत.

सौराष्ट्राचा यष्टीरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सनने ट्विट केले की, विष्णू आणि त्याच्या कुटुंबाला सलाम. हे सोपे नाही. आणखी अनेक शतके आणि यशासाठी शुभेच्छा. वडोदरा क्रिकेट असोसिएशनचे सीईओ शिशिर हट्टंगडी म्हणाले की, सोलंकी हा खऱ्या आयुष्यातील हिरो आहे.