Virendra Sehwag on Kohli and Gambhir Fight: इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL 2023) यंदाच्या हंगामातील सामना लक्षात राहिल तो लखनऊ विरुद्ध आरसीबी यांचा. कोणत्या एका क्रिकेटिंग पराक्रमामुळे नाही तर खेळाडूंच्या वादामुळे. टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा गौतम गंभीर (gautam gambhir) तर दुसरा जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल ठरत असलेला विराट कोहली (virat kohli) यांच्यातील आक्रमकतेचा परिचय प्रत्येकाला लखनऊ विरुद्ध बंगळुरू (LSG vs RCB) सामन्यात दिसून आला. या सामन्यात अनेक खेळाडूंशी किरकोळ बाचाबाची झाली. याच प्रकरणावर आता वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याने विराट आणि गंभीरवर सडकून टीका केली आहे.
सामना संपला आणि मी मी टीव्ही बंद करून झोपलो. सकाळी उठून पाहतो तर काय! सोशल मीडियावर मोठी खळबळ माजल्याचं समजलं. जो हरला तो गेला तर जो जिंकला त्याने आनंद साजरा करून निघून जावं. तुम्ह मोठे खेळाडू आहात. हे या देशाचे आयकॉन आहेत. जर आयकॉन असं वागयला लागले तर त्याचा प्रभाव पडणार, असं म्हणत सेहवागने गंभीर आणि विराट कोहलीला (Virendra Sehwag on Kohli and Gambhir Fight) झाप झाप झापलंय.
जर बीसीसीआयची (BCCI) इच्छा असेल तर ते कोणत्याही खेळाडूवर बंदी घालू शकते. तसं झालं तर भविष्यात अशी भांडणं कमी पाहायला मिळतील, असंही सेहवाग म्हणतो. तुम्ही खेळाडू असो, सपोर्ट स्टाफ असोत किंवा कोणीही असो, कोणीही हे करू नये. ते चांगले दिसत नाही. बरीच मुलं मॅच पाहतात आणि ही वाईट गोष्ट आहे. मला मुलं आहेत आणि त्यांना बेन स्टोक्सबद्दल माहिती आहे. हे चुकीचं आहे, असं म्हणत सेहवागने विराटवर(Virendra Sehwag Angry) आगपाखड केलीये.
आणखी वाचा - LIVE सामन्यात आयुष बदोनीने दिली flying kiss; धोनीही बघतच राहिला; पाहा Video
दरम्यान, गंभीर आणि सेहवाग हे चांगले मित्र, यांच्या दोस्तीचे किस्से आजही ऐकायला मिळतात. मात्र, जिथं चूक तिथं माफी नाही. आपल्या दोस्तावर सेहवागने जोरदार टीका केली. गौतम गंभीर, नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांना आयपीएल सामन्यादरम्यान आचारसंहितेचा (IPL Code of Conduct) भंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. गंभीरने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.21 अंतर्गत येणाऱ्या लेव्हल 2 गुन्ह्याची कबुली दिली आहे.