नवी दिल्ली : आयपीएलची सुरुवात 26 मार्चपासून होत आहे. आयपीएल सुरू होण्याआधी एक रंजक किस्सा समोर आला आहे. हा किस्सा वीरेंद्र सेहवाग यांच्याशी निगडीत आहे. कधीएकेकाळी आयपीएलमध्ये त्यांना कोचकडून मार खाण्याची वेळ आली होती.
सेहवागनं हा किस्सा सांगितला होता. वीरेंद्र सेहवाग त्यावेळी दिल्लीचा कर्णधार होता. एका सामन्यात अत्यंत लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी दिल्ली टीमच्या तत्कालीन कोच ग्रेग शिफर्ड खासे सेहवागवर चिडले होते. त्यांनी खेळाडूंना हॉटेलमधून बाहेर जाण्यावरही बंदी घातली.
दिल्ली संघातील कोणताही खेळाडू पार्टीमध्ये जाणार नाही अशा सूचनाही दिल्या होत्या. या सूचना देऊनही त्यावेळी दिल्ली संघातील खेळाडू पार्टी करायला गेले होते. त्यावेळी कर्णधार विरेंद्र सेहवागह होता तोही पार्टीसाठी गेला होता. ही गोष्ट कोच ग्रेग यांना समजली. त्यांनी हातात काठी घेऊन सर्वांची शाळा घेतली.
ग्रेग हातात काठी घेऊन क्लबमध्ये आले. त्यांनी सगळ्या खेळाडूंना फटके द्यायला सुरुवात केली. त्यावेळी सेहवागचीही सुटका नव्हती. ही घटना 2008 मध्ये घडली. तो किस्सा आजही न विसरण्यासारखा आहे असं सेहवागनं सांगितलं. ग्रेग शिफर्ड 2008 मध्ये दिल्ली डेअरडेविल्सचे कोच होते. त्यावेळी हा किस्सा घडला होता.
2008 मध्ये दिल्ली संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. 2008, 2009 आणि 2011, 2012 दिल्ली संघाचं कर्णधारपद विरेंद्र सेहवागकडे होतं. दिल्लीने सेमीफायनलपर्यंतचा पल्ला गाठला होता. अजून दिल्ली संघाला ट्रॉफीपर्यंत पोहोचण्यात यश आलं नाही.