हे रेकॉर्ड बनवण्यापासून विराट फक्त 'दोन' पावलं दूर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजला उद्यापासून सुरुवात होणार आहे.

Updated: Jan 31, 2018, 08:35 PM IST
हे रेकॉर्ड बनवण्यापासून विराट फक्त 'दोन' पावलं दूर title=

डरबन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये आणखी एक रेकॉर्ड करण्याची संधी भारताचा कॅप्टन विराट कोहलीला आहे. कोहलीकडे वनडे क्रिकेटमध्ये १०० सिक्स पूर्ण करण्याची संधी आहे. कोहलीनं आत्तापर्यंत २०२ मॅचमध्ये ९८ सिक्स लगावल्या आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये एकूण ३२ बॅट्समननी १०० पेक्षा जास्त सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. यामध्ये धोनी(२१६), तेंडुलकर(१९२), गांगुली(१९०), रोहित शर्मा(१६३), युवराज सिंग(१५५), विरेंद्र सेहवाग(१३५) आणि सुरेश रैना(१२०) या सात भारतीयांनी वनडेमध्ये १०० पेक्षा जास्त सिक्स मारल्या आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये कोहलीनं २०२ मॅचच्या १९४ इनिंगमध्ये विराटनं ५५.७४च्या सरासरीनं ९०३० रन्स केल्या. यामध्ये कोहलीनं ३२ शतकं आणि ४५ अर्धशतकं लगावली आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक शतकं असणाऱ्यांच्या यादीमध्ये कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये ४९ शतकं आहेत.