वनडेसाठी विश्रांती देण्यात आलेल्या विराटची टी-२०मध्ये खेळण्याबाबतही साशंकता

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आलीये. दरम्यान, यासोबतच तो टी-२० मालिकेत खेळणार की नाही याबाबतही साशंकता आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 28, 2017, 08:24 PM IST
वनडेसाठी विश्रांती देण्यात आलेल्या विराटची टी-२०मध्ये खेळण्याबाबतही साशंकता title=

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आलीये. दरम्यान, यासोबतच तो टी-२० मालिकेत खेळणार की नाही याबाबतही साशंकता आहे. 

विराट टी-२०मध्ये खेळावे की नाही याबाबत टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीशीा या आठवड्यात चर्चा करुन पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला दिली. 

विराट खेळण्याबाबत साशंकता

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विराटने निवड समितीला सांगितले की टी-२०मध्ये खेळावे की नाही याबाबतचा निर्णय घेण्यासाठी त्यांना वेळ हवाय. याचमुळे टी-२०साठी टीमची घोषणा करण्यात आली नाही. १२ डिसेंबरपर्यंत विराटची काही खाजगी कामे आहेत. यानंतर तो आराम करणार की टी-२०मध्ये खेळणार हा निर्णय पूर्णपणे त्याचा असेल.

श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका

श्रीलंकेविरुद्ध भारत तीन टी-२० सामने खेळणार आहे. पहिला सामना २० डिसेंबरला कटक, दुसरा २२ डिसेंबरला इंदूरमध्ये आणि तिसरा २४ डिसेंबरला विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. 

राष्ट्रीय निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्री आणि कोहलीच्या उपस्थिती टीम मॅनेजमेंट या आठवड्यात नवी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाच्या निवडीबाबत चर्चा करणार आहे.