विराट कोहली नाही खरेदी करणार ३४ कोटी रुपयांचा फ्लॅट

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली वरळीच्या ओंकार रिअल इस्टेटमधील नव्या घरात शिफ्ट होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याने २०१६मध्ये ओंकार रियल्टर्स अँड डेव्हलपर्सच्या रेसिडेंशियल प्रोजेक्ट ओंकार १९७३मध्ये ३४ कोटी रुपयांचा फ्लॅट घेतला होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, विराटची ही डील रद्द झालीये. विराट मुंबईत आता भाड्याच्या घरात राहतोय.

Updated: Mar 23, 2018, 03:52 PM IST
विराट कोहली नाही खरेदी करणार ३४ कोटी रुपयांचा फ्लॅट title=

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली वरळीच्या ओंकार रिअल इस्टेटमधील नव्या घरात शिफ्ट होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याने २०१६मध्ये ओंकार रियल्टर्स अँड डेव्हलपर्सच्या रेसिडेंशियल प्रोजेक्ट ओंकार १९७३मध्ये ३४ कोटी रुपयांचा फ्लॅट घेतला होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, विराटची ही डील रद्द झालीये. विराट मुंबईत आता भाड्याच्या घरात राहतोय.

सात हजार स्क्वे फूटाच्या फ्लॅटची डील २० मार्चला रद्द करण्यात आली. इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, या घराचे काम अद्याप सुरु आहे. मात्र या दरम्यान विराटने हे घर खरेदी करण्याचा विचार बदलला. हा फ्लॅट ३५व्या मजल्यावर आहे. यासाठी विराटने चार गाड्यांसाठी पार्किंग एरियाही खरेदी केला होता. 

विराट पेंटहाऊसच्या शोधात

मीडिया रिपोर्ट आणि मार्केट सूत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहली सध्या एका पेंटहाऊसच्या शोधात आहेत. कोहलीला हे पेंटहाऊस वांद्रे आणि वर्सोवा या दरम्यानच्या भागात हवेय. 

विराट राहतोय भाड्याच्या घरात

विराट सध्या पत्नी अनुष्कासह वरळीतील एका इमारतीच्या ४०व्या मजल्यावर भाड्याच्या घरात राहतोय. हे घर अॅनी बेझंट रोडवर आहे. याचा कारपेट एरिया २६७५ स्क्वे फूट आहे. यासाठी कोहलीने १.५० कोटी रुपये डिपॉझिट दिलेय. याशिवाय १.०१ लाख रुपये स्टँप ड्युटीही भरलीये.