Virat Kohli Leaked Video: विराट कोहलीच्या रूमचा व्हिडिओ लीक करणाऱ्या हॉटेल स्टाफवर कारवाई

विराटने ज्या हॉटेल कर्मचाऱ्याचे कौतूक केलं, त्यांच्यावरच इतकी मोठी कारवाई करण्याची वेळ का आली?

Updated: Oct 31, 2022, 04:20 PM IST
Virat Kohli Leaked Video: विराट कोहलीच्या रूमचा व्हिडिओ लीक करणाऱ्या हॉटेल स्टाफवर कारवाई  title=

पर्थ : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli Leaked Video) ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या हॉटेलमधील रूममधला एक खाजगी व्हिडिओ आज पहाटे लीक झाला होता. या व्हिडिओ लीक प्रकरणी आता हॉटेल व्यवस्थापनाने कठोर भूमिका घेत त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. ऑस्ट्रेलियातल्या (Australia) पर्थमध्ये ही घटना घडलीय. त्यामुळे नेमकी ही घटना काय घडलीय ते जाणून घेऊयात. 

नेमकी घटना काय? 

विराट कोहलीच्या (Virat Kohli) हॉटेल रूमचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर लीक (Virat Kohli Leaked Video)  झाला होता. हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर विराटने नाराजी व्यक्त केली होती. विराटच्या या नाराजीनंतर आता व्हिडिओ लीक करणाऱ्याला पकडण्यात आले आहे. यासोबतच हा सर्व प्रकार घडलेल्या हॉटेलच्या व्यवस्थापनाने कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. 

हॉटेल व्यवस्थापनाचा माफिनामा 

विराटच्या (Virat Kohli) रुममधला व्हिडिओ लीक झाल्यानंतर पर्थच्या हॉटेल व्यवस्थापनाने एक निवेदन जारी केले आहे. या निवदेनात त्यांनी विराटची बिनशर्त माफी मांगितली आहे. या घटनेवर हॉटेल व्यवस्थापनाने सांगितले की, या घटनेत सहभागी असलेल्यांना काढून टाकण्यात आले आहे. तो पुढे म्हणाला की, आम्हाला क्राउन पर्थ येथे एका पाहूण्यांच्या गोपनीयतेचा भंग झाल्याच्या घटनेची माहिती मिळाली आहे. आमच्या पाहुण्यांची सुरक्षा आणि गोपनीयता ही आमची पहिली प्राथमिकता आहे. या घटनेमुळे आम्ही खूप निराश झालो आहोत. त्यामुळे आम्ही पाहूण्यांची (विराटची) बिनशर्त माफी मागतो.

'आम्ही अशा वर्तनासाठी 'जीरो टॉलरेंस' धोरणाचे पालन करतो. तसेच क्राउन हॉटेलने या घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तींना वगळले आहे. हा व्हिडिओही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून लगेच काढून टाकण्यात आला. याशिवाय थर्ड पार्टीच्या सहकार्याने घटनेचा तपास सुरू असल्याचे हॉटेल व्यवस्थापणाने सांगितले आहे.  

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पराभव

दरम्यान रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) दक्षिण आफ्रिकेने (South Africa) 5 विकेट्स राखून पराभव केला. टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) टीम इंडियाचा हा पहिलाच पराभव होता. या पराभवानंतर टीम इंडिया पॉईट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. टीम इंडियाचे 3 सामन्यांत 4 गुण आहेत. तर पहिल्या स्थानावर 5 गुणांसह दक्षिण आफ्रिका आहे. टीम इंडियाच्या खालोखाल बांगलादेश 4 गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे, तर चौथ्या क्रमांकावर 3 गुणांसह झिम्बाब्वे आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (South Africa) पराभवानंतर सेमी फायनल पर्यंतची शर्यंत टीम इंडियासाठी (Team India) आणखीण कठीण झाली आहे. आता पुढील दोन सामन्यांवर टीम इंडिया कमबॅक करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.