नवी दिल्ली : अनेक दिवसांच्या क्रिकेट टूर्नामेंट्स नंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या आराम करत आहे. त्यामुळेच विराट कोहली सध्या सोशल मीडियात खूपच अॅक्टिव्ह असल्याचं पहायला मिळत आहे.
विराट कोहलीने शुक्रवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये विराट कोहली आपल्या कारमधील पाठीमागच्या सीटवर बसलेला दिसत आहे.
हा फोटो शेअर करताना विराटने म्हटलं की, थकलेल्या प्रवासानंतर अखेर मला मागच्या सीटवर (बॅक सीट) बसण्याची संधी मिळाली.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर विराट कोहलीला सध्या विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्या ऐवजी टीमची धूरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. विराट कोहलीसोबतच धोनी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडिया सध्या श्रीलंकेत ट्रायसीरिज खेळत आहे.
After a season of hectic tours, it’s finally time for me to take a backseat. pic.twitter.com/TGwGpxUpiu
— Virat Kohli (@imVkohli) March 9, 2018
एकीकडे विराटने आराम करण्याची संधी मिळाल्याने बॅक सीटवर बसल्याचं म्हटलं आहे तर त्यानंतर लगेचच ट्विटमध्ये विराटने एक वेगळं वक्तव्य केलयं. ट्विटमध्ये विराटने म्हटलयं की, आता खूप काही सुरु आहे यासंदर्भात नंतर सांगेल.
There’s a lot that’s happening right now. Fill you guys in real soon!
— Virat Kohli (@imVkohli) March 9, 2018
एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी विराट कोहलीने एक ट्विट करत चाहत्यांना आपल्या घराची एक झलक दाखवली होती.