दीपिकासोबत जाहिरात करण्यास विराटचा नकार...आरसीबीला ११ कोटींचा झटका!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या सातवे आसमान पर आहे. क्रिकेटच्या दुनियेत सध्या तो स्टार झालाय. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही त्याची बॅट तळपतेय. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही त्याने चांगली कामगिरी केली. विराट क्रिकेटत्या दुनियेतील स्टार आहे तर दुसरीकडे बॉलीवूडमध्ये दीपिकाचा जलवा सुरु आहे. दीपिकाचा बरेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरतायत. इतकंच नव्हे तर सध्याच्या घडीला दीपिका कमाईच्या बाबतीतही आघाडीवर आहे. 

Updated: Mar 23, 2018, 12:09 PM IST
दीपिकासोबत जाहिरात करण्यास विराटचा नकार...आरसीबीला ११ कोटींचा झटका! title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या सातवे आसमान पर आहे. क्रिकेटच्या दुनियेत सध्या तो स्टार झालाय. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही त्याची बॅट तळपतेय. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही त्याने चांगली कामगिरी केली. विराट क्रिकेटत्या दुनियेतील स्टार आहे तर दुसरीकडे बॉलीवूडमध्ये दीपिकाचा जलवा सुरु आहे. दीपिकाचा बरेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरतायत. इतकंच नव्हे तर सध्याच्या घडीला दीपिका कमाईच्या बाबतीतही आघाडीवर आहे. 

यातच जर क्रिकेट आणि बॉलीवूडच्या दुनियेतील हे स्टार जर एखाद्या जाहिरातीत दिसले तर त्या ब्रँडसाठी ही खूप मोठी गोष्ट असेल. विराट आणि दीपिका एका जाहिरातीत दिसणार होते. मात्र ते शक्य होऊ शकले नाही. ही जाहिरात आयपीएलच्या सीझनसाठी बनवण्यात येणार होता. 

मात्र विराट कोहलीने दीपिका पदुकोणसोबत जाहिरात करण्यास नकार दिला. एक वेबसाईट इनसाईड स्पोर्ट्सच्या मते विराटच्या या निर्णयामुळे आयपीएलमधील आरसीबीची ११ कोटी रुपयांची डील होऊ शकली नाही. 

गो आयबीबो कंपनीला विराट आणि दीपिकासोबत जाहिरात करायची होती. आरसीबीसोबत हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र अखेरच्या क्षणी विराटने जाहिरात करण्यास नकार दिला. आरसीबीच्या सूत्रांनी हे डील कॅन्सल झाल्याची माहिती दिलीये. 

आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे विराचने दीपिकासोबत जाहिरात करण्यास नकार का दिलाय. गोआयबीबोला आयपीएलसाठी विराटसोबत जाहिरात करायची होती. त्यांनी या जाहिरातीत त्यांची ब्रँड अॅम्बेसिडेर दीपिकालाही समाविष्ट करुन घेतली. या कंपनीने दीपिकाला गेल्या वर्षी ब्रँड अॅम्बेसिडेर बनवले होते. यानंतर विराटने ही जाहिरात करण्यास नकार दिला. मीडिया रिपोर्टनुसार, विराटच्या मते कंपनीच्या जाहिरातीत ब्रँड अॅम्बेसिडेर सामील होत असेल तर ही आरसीबीची जाहिरात नसेल तर कंपनीची असेल.