व्हिडिओ : धोनीच्या ३०० व्या वनडेवर विराटची प्रतिक्रिया...

श्रीलंकेविरुद्ध भारताची चौथी वनडे खास ठरली... ती माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीमुळे... 

Updated: Aug 31, 2017, 08:45 PM IST
व्हिडिओ : धोनीच्या ३०० व्या वनडेवर विराटची प्रतिक्रिया...  title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध भारताची चौथी वनडे खास ठरली... ती माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीमुळे... 

महेंद्रसिंग धोनीनं आज आपल्या करिअरमधली ३०० वी वनडे मॅच खेळली. हाच क्षण कॅप्टन विराट कोहलीनंही खास बनवला. मॅच सुरू होण्यापूर्वी विराटनं धोनीला स्मृतीचिन्ह भेट देऊन त्याचा सन्मान केला. 

यावेळी, 'आमच्यापैंकी ९० टक्के खेळाडूंनी तू कॅप्टन असताना आपल्या करिअरला सुरुवात केलीय. तू नेहमीच आमचा कॅप्टन राहशील' असं विराटनं धोनीला म्हटलं... त्यामुळे सगळेच जण भावूक झाले होते.  
 

या मॅचमध्ये धोनीनं ४२ बॉल्समध्ये नाबाद ४९ धावा केल्या. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नॉट आऊट राहण्याचा विश्वविक्रम धोनीनं केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये धोनी ७३ वेळा नॉट आऊट राहिला आहे. ३०० वी मॅच खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये धोनी सहावा खेळाडू ठरलाय. या यादीत पुढील खेळाडुंचाही समावेश आहे. 

- सचिन तेंडुललकर (१९८९-२०१२) ४६३ वनडे

- राहुल द्रविड (१९९६-२०११) ३४४ वनडे

- अझरुद्दीन (१९८५-२०००) ३३४ वनडे

- सौरव गांगुली (१९९२-२००७) ३११ वनडे

- युवराज सिंह (२०००-२०१७) ३०४ वनडे

- एम एस धोनी (२००४-२०१७) ३०० वनडे