IND vs AUS: गळ्यात साखळी सोन्याची, ही लाडी गोडी कोणाची? काय आहे Virat Kohli चं लकी Locket सिक्रेट?

Virat Kohli kisses Locket: ज्या ज्यावेळी किंग कोहली विराट कामगिरी करतो, त्यावेळी तो गळ्यातील लॉकेट काढून किस करतो. हे लॉकेट आहे तरी काय? ऑस्ट्रेलियाविरुद्घ शतक (75 century of virat kohli) ठोकल्यावर विराटने काय केलं? पाहा...

Updated: Mar 12, 2023, 05:51 PM IST
IND vs AUS: गळ्यात साखळी सोन्याची, ही लाडी गोडी कोणाची? काय आहे Virat Kohli चं लकी Locket सिक्रेट?  title=
Virat Kohli Locket Photo

Virat Kohli Locket Photo: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 4th test) यांच्यात चौथा सामना खेळला जात आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार सामना ड्रॉच्या दिशेने जात असल्याचं पहायला मिळतंय. या सामन्यात भारताचा तारणहार ठरला तो संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली (Virat Kohli). ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 480 धावांचं डोंगराऐवढं आव्हान पार करताना विराटने दमदार 186 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला 1205 दिवसांचा दुष्काळ संपवता आलाय. अशातच विराटचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असल्याचं पहायला मिळतंय. (Virat Kohli kisses locket after scoring century know secret in ind vs aus 4th test match)

शुभमन गिल (Shubman Gill) आणि किंग कोहली यांनी टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. पुजाराने टीम इंडियाला सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यानंतर विराटच्या खांद्यावर जबाबदारी आली. त्यावेळी विराच वाळवंटात वादळासमोर उभं रहावं, असा मैदानात पाय रोवून उभा राहिला. सुरूवातीला शुभमन गिल आणि नंतर के एस भरत अक्षरसोबत सावध फलंदाजी केली आणि दमदार शतक (75 century of virat kohli) झळकावलं. त्यावेळी विराटने सेलिब्रेशनवेळी (Virat Kohli Century Celebration) केलेलं एक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय.

विराट कोहलीचं सेलिब्रेशन -

अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने विराटने सेलिब्रेशन केलं. शतक पूर्ण करताच त्याने दोन्ही हात हवेत उंचावले आणि किंग इस बॅक असा इशारा विरोधी संघांना दिलाय. शतकी सेलिब्रेशन करताना विराटने त्याच्या गळ्यातील लकी लॉकेट (virat kohli locket) काढलं आणि लॉकेटला किस केलं. नेहमीप्रमाणे विराटने हे सेलिब्रेशन केलंय. त्यामुळे लॉकेट आहे तरी काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

पाहा Video - 

विराट कोहलीच्या लॉकेटमध्ये काय आहे? (What is in locket of Virat Kohli?)

खरंतर, विराट कोहलीने गळ्यात घातलेलं लॉकेट म्हणजे त्याच्या लग्नाची अंगठी (wedding ring) आहे. विराट कोहलीने 2017 मध्ये बॉलिवूडची स्टार अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्यासोबत लग्न केलं. यापूर्वी दोघांचा साखरपुडा झाला होता, त्यावेळी अनुष्काने विराट कोहलीला जी वेडिंग अंगठी (Virat Anushka) घातली होती, तीच अंगठी विराटने लॉकेटमध्ये तयार करून घेतली आहे. 

आणखी वाचा - WWE Superstar ला Virat Kohli ची भुरळ; कोहलीसोबत करायचंय 'हे' काम, म्हणाला...

दरम्यानस, ज्यावेळी विराट मैदानात उतरतो, तेव्हा त्याच्या गळ्यात हे लॉकेट असतं. विराट ज्यावेळी मोठी खेळी करतो किंवा मोठी इनिंग खेळतो तेव्हा तो या लॉकेट रिंगला किस (Virat Kohli kisses locket) करतो. ही रिंग त्याच्यासाठी लकी आहे, अशी त्याची श्रद्धा आहे. विरुष्काच्या प्रेमाचं ते लक्षण आहे, असं मानलं जातं.