Rohit Sharma नॉट-आऊट असतानाही कोहली का देत होता आऊटचा इशारा? VIDEO व्हायरल!

विराट कोहली (Virat Kohli) ने रोहित आऊट असल्याचं सांगितलं. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावेळी रोहितच्या चाहत्यांनी विराट रोहितवर जळत असल्याचं म्हटलंय.

Updated: Jan 10, 2023, 10:21 PM IST
Rohit Sharma नॉट-आऊट असतानाही कोहली का देत होता आऊटचा इशारा? VIDEO व्हायरल! title=

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्याक कमबॅक केलं. या सामन्यात त्याने तुफान फलंदाजी केली. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीसाठी ओपनिंगला उतरत रोहित शर्मा आणि शुभमन गिलने श्रीलंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. यावेळी रोहित शर्मा फलंदाजी करत असताना ड्रेसिंग रूममधून विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Rohit Sharma आऊट की नॉट आऊट?

ही घटना टीम इंडियाच्या 11 व्या ओव्हरमध्ये घडली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल तुफान फलंदाजी करत होते. अशावेळी श्रीलंकेच्या टीमला काही केला विकेट मिळवायची होती. मात्र रोहित आणि गिल थांबायचं नाव घेत नव्हते. यावेळी 11 व्या ओव्हरला वनिंदु हसरंगा गोलंदाजी करण्यासाठी आला. या ओव्हरमधील 5 व्या बॉलला त्याने रोहित शर्माला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. 

विराट कोहलीचा इशारा रोहितच्या विरोधात

बॉल टर्न झाल्याने रोहित शर्माने तो मिस केला आणि बॉल पॅडवर लागला. यावेळी अंपायरकडून नॉन आऊट करार देण्यात आला. यावेळी जेव्हा थर्ड अंपायरकडून रिव्ह्यू केला, त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या विराट कोहली (Virat Kohli) ने रोहित आऊट असल्याचं सांगितलं. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावेळी रोहितच्या चाहत्यांनी विराट रोहितवर जळत असल्याचं म्हटलंय.

गुवाहाटीच्या मैदानावर Rohit Sharma नावाचं तुफान

रोहितने पहिल्या वनडे सामन्यात तुफानी फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आहे. आजच्या या सामन्यात रोहितने 83 रन्सची खेळी केली. वनडे करियरमधील रोहितचं हे 47 वं अर्धशतक होतं. बांगलादेशाविरूद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावलं होतं.

टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गेल्या अनेक काळापासून आउट ऑफ़ फॉर्म होता. त्याने वनडेमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना त्याचे 2019 मध्ये शेवटचं शतक झळकावलं होतं. तर 19 जानेवारी 2020 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध शतक झळकावलं होतं. 

अर्धशतक झळकावल्यानंतर रोहित शर्मा भावूक

दीर्घकाळानंतर कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावलं आहे. या हाफ सेंच्युरीनंतर रोहित भावूक झालेला दिसला. हिटमॅनने 50 अर्धशतक पूर्ण करत पहिल्यांदा आकाशाकडे पाहिलं आणि त्यानंतर हवेत बॅट फिरवली. त्याच्या हावभावावरून आकाशाकडे पाहून तो देवाचे आभार मानत होता.