विराटने कॅच सोडला अन् झहीर खानचं करियर संपलं; इशांत शर्मानं सांगितला 'तो' किस्सा!

Virat kohli ended zaheer khan career: झहीरला 100 कसोटींचा टप्पा ओलांडता आला नाही. यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी इशांतने 9 वर्षांपूर्वीचा एक मनोरंजक किस्सा सांगितला. त्यावर झहीरने देखील स्पष्टीकरण दिलं.

Updated: Jul 25, 2023, 11:05 PM IST
विराटने कॅच सोडला अन् झहीर खानचं करियर संपलं; इशांत शर्मानं सांगितला 'तो' किस्सा! title=
zaheer khan, Virat kohli Catch

Ishant Sharma On Virat kohli Catch: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने मालिका खिश्यात घातली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पावसाने थैमान घातलं आणि सामना ड्रॉ झाल्याचं दिसून आलं. दुसऱ्या सामन्यात झहीर खान आणि इशांत शर्मा यांनी समालोचकाची जबाबदारी सांभाळली होती. त्यावर इशांत शर्माने एक किस्सा सांगितला. झहीरला 100 कसोटींचा टप्पा ओलांडता आला नाही. यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी इशांतने 9 वर्षांपूर्वीचा एक मनोरंजक किस्सा सांगितला. त्यावर झहीरने देखील स्पष्टीकरण दिलं.

नेमका किस्सा काय?

टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर होती. त्यावेळी सामना सुरू असताना लंचच्या आधी विराट कोहलीने कॅच सोडला. या सामन्यात ब्रँड्न मॅक्युलमने ट्रिपल सेंच्युरीच्या जवळ होता. विराटने कॅच सोडला अन् झहीर चांगलाच भडकला होता. त्यावेळी पलेवियनममध्ये जाताना विराट झहीरला सॉरी म्हणाला. तू टेन्शन घेऊ नको, आपण त्याला आउट करू, असं म्हणत झहीरने विराटला शांत करण्याचा प्रयत्न केला. चहाचा ब्रेक झाला तेव्हा विराटनं पुन्हा झहीरची माफी मागितली. तिसर्‍या दिवशी पुन्हा विराटनं माफी मागितली तेव्हा.. तू माझं करिअर संपवलंस, असं झहीरने म्हणाला अशी चर्चा झाली, असं इशांत शर्मा म्हणतो.

इशांतच्या या वक्तव्यावर झहीरने स्पष्टीकरण दिलं. करिअर संपवण्याबद्दल विराटला मी काहीही बोललो नव्हतो. मी फक्त त्याला जुनी आठवण करून दिली होती, असं झहीर म्हणतो. आत्तापर्यंत इतिहासात दोनच खेळाडूंनी झेल सुटल्यानंतर 300 धावा केल्या आहेत. किरण मोरे याने ग्रॅहम गूच याचा कॅच सोडला अन् ग्रॅहम गूचने तीनशे मारले आणि दुसरा म्हणजे मॅक्युलम. तुझ्या एका चुकीमुळे ब्रँड्न मॅक्युलमला तीनशे धावा करता आल्या, त्यामुळे असं बोलू नकोस असं म्हटल्याचं झहीरने सांगितलं.

आणखी वाचा - Harmanpreet Kaur असो वा MS Dhoni; टीम इंडियाच्या 'या' 4 कॅप्टनने घातला अंपायर्ससोबत राडा!

दरम्यान, झहीरने हा किस्सा सांगितल्यानंतर दोघंही हसायला लागले. झहीर खान आणि इशांत शर्मा यांच्यातील टेस्ट करियरमध्ये बरच सामन्य दिसून येतं. या दोघांनीही कसोटी क्रिकेटमध्ये 311 बळी घेतले आहेत. इशांत आणि झहीरनं दोघांनीही 11 वेळा 5 आणि एकदा 10 विकेट्स घेतल्या आहेत.