टीम इंडियाने केरळमधील पूरग्रस्तांना समर्पित केला विजय

टीम इंडियाचा दणदणीत विजय

Updated: Aug 22, 2018, 05:28 PM IST
टीम इंडियाने केरळमधील पूरग्रस्तांना समर्पित केला विजय title=

नॉटिंघम : भारताने आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर ट्रेंट ब्रिज मैदानावर झालेल्या तिसऱ्या सामन्यामध्ये शेवटच्या दिवशी इंग्लंडवर 203 रनने विजय मिळवला. भारताने इंग्लंड समोर विजयासाठी 521 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. इंग्लंडची दुसरी इनिंग 317 रनवर संपली.

विजय पूरग्रस्तांना समर्पित

कर्णधार विराट कोहलीने टीमचा विजय हा केरळमधील पूरग्रस्तांना समर्पित केला आहे. केरळमध्ये सध्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नॉटिंघम टेस्टमध्ये विजयानंतर बोलताना विराटने म्हटलं की, 'सगळ्यात आधी आम्ही हा विजय एका टीमच्या रुपात केरळच्या पूरग्रस्ताना समर्पित करत आहोत. पुरामुळे अनेक लोकांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण कमीत कमी आम्ही त्यांच्यासाठी ऐवढं तरी करु शकतो.

देशभरातून मदत

केरळमध्ये मदतीसाठी अनेक सरकारी संस्था आणि एनजीओ मदत कार्य करत आहे. केरळमध्ये 450 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 2 लाखापेक्षा अधिक लोकं बेघर झाले आहेत. राज्यामध्ये 19 हजार कोटींची संपत्तीचं नुकसान झालं आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातलं आहे. 12 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 

भारताचं कमबॅक

भारताने तिसऱ्या टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 329 रन केले होते. इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये 161 रन केले. दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीने शानदार शतक ठोकलं. भारतीय टीमने 7 विकेट गमवत 352 रन केले आणि इंग्लंडला 521 रनचं लक्ष्य दिलं. पण इंग्लंड फक्त 317 रनचं करु शकली. भारताने 203 रनने इंग्लंडवर विजय मिळवला. भारत पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये 1-2 ने मागे आहे.