मुंबई : आयसीसीने नुकतीच टेस्ट क्रमवारीची घोषणा केली आहे. बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ९२२ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन ९१३ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेतेश्वर पुजारा ८८१ पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
देशांच्या क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर, न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर, दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर, इंग्लंड चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे. बॉलरच्या यादीमध्ये रवींद्र जडेजा सहाव्या आणि आर.अश्विन दहाव्या क्रमांकावर आहे. टॉप-१० बॉलरमध्ये हे दोनच भारतीय आहेत.
बॉलरच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर आणि इंग्लंडचा जेम्स अंडरसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांमध्ये १६ पॉइंट्सचे अंतर आहे. पॅट कमिन्सचे ८७८ आणि जेम्स अंडरसनच्या खात्यात ८६२ पॉइंट्स आहेत.
ऑगस्ट १ पासून ऍशेस सीरिजला सुरुवात होत आहे. त्यामुळे पॅट कमिन्स आणि जेम्स एंडरसन यांच्यात अव्वल क्रमांकावर पोहचण्याची आणि कायम राहण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
ऑल राऊंडरच्या यादीमध्ये रवींद्र जडेजा तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर पहिल्या आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या क्रमांकावर आहे.