RCB Win WPL Trophy : आरसीबीने ट्रॉफी उचलताच आला विराटचा व्हिडीओ कॉल, स्मृती मानधना म्हणाली...

Virat Kohli Video Call : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फायनल जिंकल्यानंतर विराट कोहलीने व्हिडीओ कॉल करत स्मृती मानधनाचं (Smriti Mandhana) अभिनंदन केलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

सौरभ तळेकर | Updated: Mar 18, 2024, 12:05 AM IST
RCB Win WPL Trophy : आरसीबीने ट्रॉफी उचलताच आला विराटचा व्हिडीओ कॉल, स्मृती मानधना म्हणाली... title=
Virat Kohli congratulating Smriti Mandhana And RCB players

Virat Kohli On RCB Trophy : नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या वुमन्स प्रीमियर लीग (Royal Challengers Bangalore) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव केला. यंदा डब्ल्यूपीएलला नवा चॅम्पियन मिळाला आहे. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने हे विजेतेपद पटकावले होते. मात्र, या वर्षी आरसीबीने बाजी मारली अन् आरसीबी फ्राँचायझीचा दुष्काळ संपवला. कॅप्टन स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) नेतृत्वाखाली आरसीबीने विजयाचा नारळ फोडला. अशातच टीम इंडियाचा आणि आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat kohli) याने आरसीबीच्या महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. 

आरसीबीने फायनल जिंकल्यानंतर विराट कोहलीने स्वत: व्हिडीओ कॉल करत स्मृती मानधनाचं अभिनंदन केलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. विराटचा फोन आला अन् त्याने आमचं अभिनंदन केलं. मॅक्सी आणि इतर खेळाडूंनी देखील अभिनंदन केलं, असं स्मृतीने सांगितलं. एवढंच नाही तर विराटने सोशल मीडियावर आरसीबीचा फोटो शेअर करत सुपरवुमन म्हणत संघाचं कौतूक केलं.

काय म्हणाली स्मृती मानधना?

माझ्यासाठी याठिकाणी व्यक्त होणं खरोखर कठीण आहे. मी एक गोष्ट सांगेन की मला टीमचा अभिमान आहे. आमची टीम खरोखर उत्तम होती. आम्ही दिल्लीत आलो आणि आम्हाला दोनदा पराभव पत्करावा लागला. मात्र, आम्ही आमच्या कमजोर बाजूवर काम केलं अन् आज आम्ही जिंकलो. आमच्या संघात खूप उत्सुकता नव्हती, सर्वांना माहित होतं की आपलं काम आपल्याला करायचंय. मात्र, सर्वांनी चांगली कामगिरी केली याचा मला आनंद आहे. एक विधान नेहमी समोर येतं ते म्हणजे 'ई साला कप नमदे'. आता हा 'ई साला कप नामदू' आहे, असं स्मृती म्हणते.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्लीने दिलेलं किरकोळ आव्हान आरसीबीला (Royal Challengers Bangalore) आरामात पूर्ण करता आलं नाही. दिल्लीने कडवी झुंज दिली. अखेरच्या ओव्हरपर्यंत झालेल्या या सामन्यात रिचा घोषने (Richa Ghosh) फोर मारत आरसीबीच्या विजयाचं स्वप्न पूर्ण केलं. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (C), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (WK), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (C), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (WK), शिखा पांडे, मिन्नू मणी.