विराटचं शतक, योगायोग आणि बरंच काही

विराटच्या वनडे कारकिर्दीतीलं हे ४०वं शतकं ठरलं.

Updated: Mar 5, 2019, 09:51 PM IST
विराटचं शतक, योगायोग आणि बरंच काही title=

मुंबई : विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये ११६ रनची शतकी खेळी केली. त्याच्या वनडे कारकिर्दीतीलं हे ४०वं शतकं ठरलं. या शतकी खेळीसोबत योगायोग घडला आहे. हा योगायोग कोहलीच्या ३९ आणि ४० व्या शतकाबद्दल आहे.

यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटनं ३९वं शतक केलं. तर ४०वं शतकही विराटनं ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील दुसऱ्याच वनडेमध्ये केलं. योगायोग म्हणजे विराटच्या ३९व्या आणि ४०व्या शतकावेळी मंगळवारच होता. विराटनं जेव्हा ३९वं शतक केलं होतं तेव्हा भारताचा सहा विकेटनी विजय झाला होता. 

विराट कोहलीने नागपूरच्या या मैदानावर दुसऱ्यांदा शतकी कामगिरी केली आहे. भारतीय टीम संकटात असताना आणि सातत्यानं विकेट जात असताना विराटने तारणहाराची भूमिका निभावली. कोहलीने एकूण १२० बॉलचा सामना केला, यात त्याने १० फोरच्या मदतीने ११६ रनची खेळी केली. विराट कोहलीने विजय शंकरला सोबत घेत ८१ रनची महत्वपूर्ण पार्टनरशीप केली. यानंतर रविंद्र जडेजा सोबत देखील कोहलीने ६७ रनची पार्टनरशीप केली. या दोन्ही महत्वाच्या पार्टनरशिपमुळे भारताच्या खेळीला स्थिरता मिळाली. याआधी नागपूरच्या मैदानावर कोहलीने २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११५ रनची खेळी केली होती. भारतने ही मॅच ६ विकेटने आपल्या खिशात घातली होती. 

सचिनजवळ पोहोचला कोहली

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण १०० शतकं लगावले आहेत. या रेकॉर्डच्या आसपास सध्यातरी कोहली शिवाय कोणीच दिसत नाही. कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ६५ शतकं झाली आहेत. कोहलीच्या नावे टेस्ट मध्ये २५ आणि वनडे मध्ये ४० शतकं आहेत.