IND vs NZ : तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का; Virat Kohli दुखापतग्रस्त

टीम इंडियाचा किंग कोहली दुसऱ्या वनडे सामन्यात फिल्डींग करताना दुखापतीग्रस्त झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Updated: Jan 22, 2023, 02:10 PM IST
IND vs NZ : तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का; Virat Kohli दुखापतग्रस्त title=

Virat Kohli injury : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील वनडे सिरीजचा शेवटचा सामना 24 जानेवारी म्हणजेच मंगळवारी खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने आधीच 2 सामने जिंकल्यामुळे सीरिजवर भारताचा (India win ODI series) कब्जा आहे. इंदूरमध्ये तिसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येणार असून या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारतीय टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या वनडेमध्ये दुखापतग्रस्त झाला आहे. 

Virat Kohli च्या हाताला झाली दुखापत

टीम इंडियाचा किंग कोहली दुसऱ्या वनडे सामन्यात फिल्डींग करताना दुखापतीग्रस्त झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ग्लेन फ्लिप्सने कव्हर डाईव्हवर शॉट मारला. हा शॉट रोखण्यासाठी विराटने उंच उडी घेतली, जेणेकरून तो बॉल थांबवू शकेल. यामध्ये बॉल थांबला नाही, मात्र विराट कोहली एंजर्ड झाला आहे. 

फिल्डींगदरम्यान दुखापत झाल्यानंतर विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये परतला होता. यावेळी फिजीओने त्याच्या हातावर पट्टी देखील बांधली. मात्र दुखापत असूनही तो पुन्हा मैदानावर उतरला होता. त्यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात विराट कोहलीला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

कोहलीच्या जागी टीममध्ये कोणाला मिळणार संधी?

जर तिसऱ्या सामन्यात कोहलीला संधी दिली गेली नाही तर प्लेईंग 11 मध्ये रजत पाटीदारला संधी मिळू शकते. सध्यातरी कोहलीच्या या दुखापतीबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

टीम इंडियाने जिंकली सीरिज

न्यूझीलंडविरूद्धचा दुसरा वनडे टीम इंडियाने 8 विकेट्सने जिंकला. या सामन्यासह भारताने सीरिज देखील खिशात घातली आहे. या सामन्यात रोहित शर्माची बॅट अखेर तळपली. कर्णधाराने ओपनिंगला उतरत अर्धशतक झळकावलं आणि टीमला विजय मिळवून दिला. अवघ्या 21 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने हे लक्ष्य गाठलं आहे.

रोहित शर्माची कॅप्टन इनिंग

शनिवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माने तुफान फलंदाजी केली. यावेळी त्याने 50 बॉल्समध्ये रन्सची खेळी केली. यामध्ये कर्णधाराने 7 फोर आणि 2 सिक्सेसचा समावेश आहे. तर शुभमन गिलने 53 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली. रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर विराट कोहली देखील मैदानात उतरला होता. मात्र अवघ्या 11 रन्सवर त्याला माघारी परतावं लागलं.