मुंबई : बीसीसीआयने भारतीय क्रिकेटर्सची सॅलरीत जबरदस्त वाढ केली आहे. बोर्डाने टॉपच्या क्रिकेटर्सला यंदा A+ आणि A अशा दोन श्रेणी बनविल्या आहेत. यानुसार प्रत्येकाचा पगार ठरविण्यात आला आहे. तीनही फॉर्मेट ( टेस्ट, वन डे आणि टी २० )मध्ये कर्णधारपद सांभाळणाऱ्या विराट कोहलीला सर्वाधिक फायदा झाला आहे.
विराट कोहली गेल्या सत्रात ३.०७ लाख डॉलर (२ कोटी) मिळत होते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याला १.२० मिलियन डॉलर म्हणजे ७.८१ कोटी रुपये आणि इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट याला साडे सहा कोटी रूपये वार्षिक मिळत होते. विराट पेक्षा अधिक सॅलरी या दोघांना मिळत होती. पण आता बीसीसीआयच्या नवे सॅलरी स्ट्रक्चर जाहीर केल्यानंतर विराट या दोघांच्या पुढे निघाला आहे. बोर्डाने दिलेले वेतन आणि मॅच फी आणि आयपीएलचा कॉन्ट्रॅक्ट मिळून विराटला वार्षिक ४१ लाख डॉलर म्हणजे साधारण २७ कोटी रुपये मिळतात.
इतकी कमाई असली तरी विराट जगभरातील खेळाडूंपेक्षा खूप मागे आहे. रिअल मॅड्रीड फूटबॉल क्लबकडून खेळणारा स्टार फूटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोला वर्षाला ५८ मिलियन डॉलर म्हणजे ३७७ कोटी रूपये कमिवतो.
ब्रिटिश फॉर्मुला वन रेसर लुईस हॅमिल्टन याचे वार्षीक उत्पन्न ३८ मिलियन डॉलर (२४७ कोटी रुपये ) आहे. हॅमिल्टन मर्सिडीज एएमजी पेट्रोनास टीमकडून कार रेसिंग करतो. सर्वाधिक फॉर्मुला वन ग्रांड प्री जिंकणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
अमेरिकेचा बास्केटबॉल प्लेअर लेब्रॉन जेम्स याला ३१.२ मिलियन डॉलर (२०३ कोटी रुपये) कमावतो. लेब्रॉन क्लीवलँड कॅवेलियर्सकडून खेळतो तसेच तो राष्ट्रीय
टीमचा हिस्सा आहे.
स्वीत्झलँडचा सुप्रसिद्ध खेळाडू रॉजर फेडरर पण कमाईत विराट कोहलीच्या पुढे आहे. त्याला वर्षाला ६० लाख डॉलर म्हणजे ३९ कोटी रुपये मिळतात. सिंगल्समध्ये सर्वात जास्त टायटल जिंकणाऱ्यांमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे.