कोहली बनला फुटबॉल टीमचाही कॅप्टन, धोनीही देईल साथ

सुरूवातीला तुम्हालाही धक्का बसला असेल की, असे कसे? पण हे खरे आहे. क्रिकेट टीम इंडियाचा कर्णधार आता फुटबॉल टीमचाही कर्णधार म्हणून निवडला गेलाय. एक मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळवला जाणार आहे.

Updated: Oct 11, 2017, 08:59 AM IST
कोहली बनला फुटबॉल टीमचाही कॅप्टन, धोनीही देईल साथ title=

मुंबई : सुरूवातीला तुम्हालाही धक्का बसला असेल की, असे कसे? पण हे खरे आहे. क्रिकेट टीम इंडियाचा कर्णधार आता फुटबॉल टीमचाही कर्णधार म्हणून निवडला गेलाय. एक मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळवला जाणार आहे.

या सामन्यात विराट ऑल हार्ट्स टीमचा कर्णधार असेल. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हा सामना १५ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता खेळला जाणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यात विराटसोबतच एम.एस.धोनीही खेळणार आहे. 

टीम इंडियाच्या फेसबुक पेजवर या फुटबॉल सामन्याची माहिती देण्यात आलीये. बॉलिवूड कलाकारांची टीम असलेल्या ऑल स्टार्स फुटबॉल टीमचा कर्णधार अभिनेता रणबीर कपूर असेल. हा सामना अभिषेक बच्चन आणि विराट कोहली यांच्या चॅरिटी फाऊंडेशनसाठी खेळवला जात आहे. 

विराट आणि धोनी हे दोन्ही दिग्गज आता क्रिकेटऎवजी फुटबॉल खेळताना दिसणार असल्याने या सामन्याची उत्सुकता वाढली आहे. क्रिकेटच्या मैदानात सिक्सर आणि फोर लगावणारे हे खेळाडू फुटबॉलच्या मैदानात किती गोल करतील हे बघणे रोमांचक ठरणार आहे.