कोहली-रहाणेच्या पार्टनरशीपचा रेकॉर्ड!

२०१७ नंतर भारतीय टीमच्या चांगल्या कामगिरी मागे विराट कोहलीचा फॉर्म सगळ्यात मोठी भूमिका बजावतोय.

Updated: Oct 14, 2018, 10:50 PM IST
कोहली-रहाणेच्या पार्टनरशीपचा रेकॉर्ड! title=

हैदराबाद : २०१७ नंतर भारतीय टीमच्या चांगल्या कामगिरी मागे विराट कोहलीचा फॉर्म सगळ्यात मोठी भूमिका बजावतोय. याचं महत्त्वाचं कारण आहे कोहली चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येतोय आणि अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करतोय. भारत आता एका वर्षापेक्षा जास्त काळ टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. याच मुख्य कारण भारतीय बॅट्समनचा दबदबा. घरगुती मैदानात तर भारतीय बॅट्समनचं वर्चस्व आणखी जास्त आहे.

भारतीय टीमचा कर्णधार कोहली आणि उपकर्णधार रहाणे एक-दुसऱ्याला पूरक अशी बॅटिंग करतात. रहाणे आणि कोहली बॅटिंग करताना एकमेकांना समजून घेतात. या कारणामुळे दोघांमध्ये चांगली पार्टनरशीप होते.

२०१७ पासून कोहली आणि रहाणेनं १६ इनिंगमध्ये ६२.२० च्या सरासरीनं ९३३ रनची पार्टनरशीप केली आहे. दोघांनी हैदराबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध चौथ्या विकेटसाठी ६० रनची पार्टनरशीप केली. याचबरोबर विराट आणि रहाणेनं दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमला आणि डीन एल्गारच्या पार्टनरशीपचं रेकॉर्ड मोडलं.

हाशीम आमला आणि डीन एल्गारनं १८ इनिंगमध्ये ९१७ रनची पार्टनरशीप केली आहे. पार्टनरशीपचं रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्याच डीन एल्गार आणि एडन मार्करमच्या नावावर आहे. या दोघांनी २२ इनिंगमध्ये ९६८ रन केले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये विराट आणि अजिंक्यला हे रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.