आजच्या दिवशीच १० वर्षांपूर्वी विराटने केली होती 'ही' कामगिरी

टीम इंडियाने क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. यामध्ये कॅप्टन विराट कोहलीनेही चांगलं योगदान दिलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 2, 2018, 04:59 PM IST
आजच्या दिवशीच १० वर्षांपूर्वी विराटने केली होती 'ही' कामगिरी title=
File Photo

नवी दिल्ली : टीम इंडियाने क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. यामध्ये कॅप्टन विराट कोहलीनेही चांगलं योगदान दिलं आहे.

कोहलीची 'विराट' कामगिरी

विराट कोहलीची आज होळीच्या दिवशी चर्चा होत आहे त्यामागे कारणंही तसचं आहे. कारण, आजच्या दिवशी म्हणजेच २ मार्च २००८ मध्ये विराट कोहलीने एक मोठी कामगिरी केली होती. या दिवशी विराट कोहलीने अंडर-१० टीमची कॅप्टनशीप करताना अंडर-१९ वर्ल्डकप जिंकून दिला होता.

दक्षिण आफ्रिकन टीमचा पराभव

विराट कोहलीने २००८ मध्ये अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची धूरा सांभाळली होती. मलेशियातील क्वालालांपूरमध्ये खेळण्यात आलेल्या या मॅचमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकन टीमचा पराभव केला होता.

Virat kohli won U 19 WC on 2 march

मोठा स्कोअर करण्यात टीम इंडियाला अडथळा

टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकन टीमने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात आलेल्या टीम इंडियाला मोठा स्कोअर उभा करण्यात आफ्रिकन टीमने अडथळा निर्माण केला.

विराटने केवळ १९ रन्स केले

या मॅचमध्ये विराटला चांगली कामगिरी करता आली नाही. विराटने ३४ बॉल्समध्ये केवळ १९ रन्स बनवले. टीम इंडिया ४६ ओव्हर्समध्ये केवळ १५९ रन्सवर ऑल आऊट झाली होती.

मॅच दरम्यान पावसाचा अडथळा आल्याने आफ्रिकन टीमला २५ ओव्हर्समध्ये ११६ रन्स बनवण्याचं आव्हान मिळालं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या आफ्रिकन टीमने २५ ओव्हर्समध्ये आठ विकेट्स गमावत केवळ १०३ रन्सपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकत एक नवा इतिहास रचला.