अभिनंदन नीता भाभी...; नीता अंबानींविषयी केलेलं विजय मल्ल्याचं ते ट्विट व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं भवितव्य आता मुंबई इंडियन्सच्या हातात आहे. अशातच विजय मल्लाचं ट्विट व्हायरल झालं आहे.

Updated: May 21, 2022, 09:23 AM IST
अभिनंदन नीता भाभी...; नीता अंबानींविषयी केलेलं विजय मल्ल्याचं ते ट्विट व्हायरल title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग आता शेवटच्या टप्प्यात असून प्लेऑफ गाठण्यासाठी चौथ्या क्रमांकावर कोणत्या टीमची वर्णी लागणार हे निश्चित झालं नाहीये. यामध्ये आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं भवितव्य आता मुंबई इंडियन्सच्या हातात आहे. शनिवारी रोहित शर्माच्या टीमने दिल्ली कॅपिटल्सचा शेवटच्या सामन्यात पराभव केला तर RCB प्लेऑफमध्ये पोहोचेल. मात्र दिल्ली जिंकली तर आरसीबीचा प्रवास संपेल.

यानंतर आजच्या दिल्ली-मुंबई सामन्यापूर्वी विजय मल्ल्याचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होतंय. मल्ल्याने त्या ट्विटमध्ये मुंबई इंडियन्सच्या लिलावाच्या रणनीतीचे कौतुक केलं होतं. मुळात हे ट्विट 10 वर्षांपूर्वीचं आहे

मल्ल्याने लिहिले की, 'माझ्या मते आयपीएल लिलावात सर्वोत्तम खरेदी मुंबई इंडियन्सने केली. त्यांच्याकडे खेळाडूंची मोठी टीम आहे. अभिनंदन निता वहिनी..."

तर आता 10 वर्षांपूर्वीचं विजय मल्ल्याचं ट्विट सोशल मीडियावर तुफार व्हायरल झालंय. यावेळी युझर्सने विजय मल्ल्याला त्याला ट्रोलंही केलंय.

आरसीबीला पहिल्या विजयाची प्रतिक्षा

आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय टीमपैकी एक असलेल्या आरसीबीने आतापर्यंत एकही विजेतेपद जिंकलेलं नाही. आरसीबीला केवळ तीनदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश आलंय. 2017 आणि 2019 च्या सिझनमध्ये ही टीम तळाशी राहिली. 2020 च्या सिझनमध्ये टीमने प्लेऑफमध्ये प्रवेश केला, परंतु ट्रॉफी जिंकण्यात त्यांना यश आले नाही. तर यावेळी प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे भाग्य मुंबईच्या हातात आहे.