Rovman Powell ठरला सर्वात नशीबवान; बॉल स्टंपला लागला तरीही Nou-out, VIDEO व्हायरल

अखेरीस निकोलस पूरनच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला.

Updated: Oct 8, 2022, 10:57 AM IST
Rovman Powell ठरला सर्वात नशीबवान; बॉल स्टंपला लागला तरीही Nou-out, VIDEO व्हायरल title=

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 31 रन्सने पराभव करत दोन सामन्यांची टी-20 मालिका 2-0 अशी जिंकली. या सामन्यात वेस्ट इंडिजला विजयासाठी 179 रन्सचं लक्ष्य मिळालं होतं. मात्र फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे पुन्हा एकदा वेस्ट इंडिजला पराभवाला सामोरं जावं लागले. या सामन्यातही कॅरेबियन फलंदाजांना दमदार सुरुवात झाली मात्र एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस निकोलस पूरनच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात अनेक रोमांचक क्षण असले तरी एक क्षण असा आला जेव्हा बॉल स्टंपला लागला पण बेल्स पडले नाहीत. हा मजेदार क्षण वेस्ट इंडिजच्या डावाच्या 17व्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. जेव्हा पॅट कमिन्सच्या पहिल्या बॉलवर रोव्हमन पॉवेलने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण तो स्लोअर बॉल वाचू शकला नाही. बॉल त्याच्या पॅडच्या मधोमध जाऊन स्टंपवर आदळला पण बेल्स पडलं नाहीत.

बॉल लागूनही बेल्स न पडल्याने कॉमेंट्रीटर्सना देखील आश्चर्य वाटले तर पॉवेल हसताना दिसला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या घटनेचा व्हिडिओ देखील शेअर केलाय. ज्यावर चाहते खूप कमेंट करतायत. 

अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. बॉल स्टंप्सना आदळला तरी बेल्स पडत नाहीत असा गोलंदाजांच्या अडचणी वाढवणारा हा क्षण यापूर्वीही अनेकदा दिसून आलं आहे.

अशा परिस्थितीत अशा घटना घडू नयेत यासाठी ICC आगामी काळात काही उपाय करते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.