VIDEO: कपिल देव यांच्या बाऊंसरने धोनीही झाला गारद

क्रिकेट विश्वातील महान ऑलराऊंडर क्रिकेटर्सपैकी एक असलेल्या कपिल देवची जादू अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 11, 2017, 04:23 PM IST
VIDEO: कपिल देव यांच्या बाऊंसरने धोनीही झाला गारद title=
Image: Screen Grab

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातील महान ऑलराऊंडर क्रिकेटर्सपैकी एक असलेल्या कपिल देवची जादू अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे. कारण, कपिल देव यांनी बाऊंसर टाकत सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का दिला आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

कपिल देव यांनी असाच एक बाऊंसर महेंद्रसिंग धोनी याला टाकला. कपिल यांनी टाकलेल्या बाऊंसरमुळे बॉल इतका उंच उडाला की धोनीला सुद्धा धक्का बसला.

आता तुम्ही विचार करत असाल की, धोनी आणि कपिल देव यांच्यात क्रिकेटची मॅच झाली तरी कधी? पण जरा थांबा... कारण, हा किस्सा कुठल्याही मॅचमधला नाहीये तर एका जाहिरातीमध्ये घडला आहे.

कोलकातामध्ये एका जाहिरातीच्या शूटींगसाठी कपिल आणि धोनी दाखल झाले. कपिल देव यांनी १९८३ साली भारताला वर्ल्डकप मिळवून दिला. तर, २०११ साली वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या टीमचा धोनी कॅप्टन होता.

एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये कपिल देव यांनी धोनीसाठी बॉलिंग टाकली. त्यानंतर धोनीनेही कपिल देव यांना बॉलिंग टाकली.

या जाहिरातीचं दिग्दर्शन बांग्लाचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक अरिंदम सिल यांनी केलं आहे. अरिंदम यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणारे कॅप्टन माझ्यासाठी शूटिंग करत आहेत आणि हा क्षण माझ्या नेहमीच लक्षात राहील.