IND vs AUS : दिनेश कार्तिकने केल्या एकापाठोपाठ तीन चुका, रोहित शर्माला राग अनावर; पाहा Video

रोहित शर्माने दिनेश शर्माची मान पकडल्याचे पाहायला मिळालं

Updated: Sep 20, 2022, 11:38 PM IST
IND vs AUS : दिनेश कार्तिकने केल्या एकापाठोपाठ तीन चुका, रोहित शर्माला राग अनावर;  पाहा Video title=

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा (IND vs AUS) 4 विकेट्सने पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियासाठी (India vs Australia T20I) मॅथ्यू वेडने अप्रतिम खेळ दाखवत संघाला विजय मिळवून दिला आहे. डेथ ओव्हर्समध्ये मॅथ्यू वेडने तुफानी कामगिरी केली. मॅथ्यू वेडमुळेच ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवता आला. तर भारतीय संघाचे स्टार खेळाडू भुवनेश्वर कुमार (bhuvneshwar kumar) आणि हर्षल पटेल (harshal patel) यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. टी-20 मालिकेच्या पहिल्याच सामन्यात सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं.

प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने 6 बाद 208 धावांची मोठी मजल मारली. मात्र, असे असूनही भारताला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सामना जिंकण्यासाठी धावा रोखणं आणि विकेट घेणे महत्त्वाचे होतं. मात्र भारतीय संघाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.

यामुळे कर्णधार रोहित शर्मालाही राग अनावर झाला. सामन्यादरम्यान रोहित शर्मा दिनेश कार्तिकवर (dinesh karthik) रागावल्याचे पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

अक्षर पटेलने (akshar patel) स्वस्तात कर्णधार अॅरॉन फिंचला (Aaron Finch) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर युझवेंद्र चहलने (yuzvendra chahal) स्टीव्ह स्मिथला (steve smith) आपल्या जाळ्यात अडकवले. चहलच्या चेंडूवर स्मिथ स्टंमच्या मधोमध अचूक सापडला, पण दिनेश कार्तिकने (dinesh karthik) किंवा अन्य कोणत्याही खेळाडूने एलबीडब्ल्यूसाठीअपील केले नाही. चहलच्या षटकात कार्तिकने एलबीडब्ल्यूचा निर्णय घेतला नाही आणि त्यानंतर उमेश यादवच्या षटकात दोन्ही वेळा बाद करण्याचे अपील केले नाही. एकापाठोपाठ एक तीन चुका केल्यानंतर रोहितने (Rohit Sharma) कार्तिकवर चिडून त्याची मान पकडली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोमध्ये रोहितने यष्टिरक्षक कार्तिकची मान पकडून ती जोरात हलवत असल्याचे दिसून आले. रोहित त्याच्यावर ओरडत असल्याचेही दिसून आले. कार्तिकवर ओरडत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहतेही रोहितवर टीका करत आहेत.