RCB vs KKR: व्यंकटेश अय्यरने पूर्ण केली गंभीरची इच्छा, होमग्राऊंडवर केकेआरकडून RCB चा पराभव

RCB vs KKR: या सामन्यात केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने केकेआरला जिंकण्यासाठी 183 रन लक्ष्य दिलं होतं. या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत 83 रन्सची नाबाद खेळी केली. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 29, 2024, 10:58 PM IST
RCB vs KKR: व्यंकटेश अय्यरने पूर्ण केली गंभीरची इच्छा, होमग्राऊंडवर केकेआरकडून RCB चा पराभव title=

RCB vs KKR: आयपीएलच्या 10 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध आरसीबी समोरासमोर आले होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा पराभव केला आहे. यावेळी 7 विकेट्सने केकेआरने आरसीबीला मात दिली. या विजयासह केकेआरने या सिझनमध्ये दुसरा विजय मिळवला आहे. तर आरसीबीचा हा दुसरा पराभव आहे. 

केकेआरला 183 रन्सचं होतं लक्ष्य

लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील नरीन आणि फिल सॉल्टने कोलकाता नाईट रायडर्सला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी 39 बॉल्समध्ये 86 रन्सची पार्टनरशिप केली. नरेनने 22 बॉल्समध्ये 5 सिक्स आणि 2 फोरसह 47 रन केले. तर सॉल्टने 20 बॉल्समध्ये दोन फोर आणि तब्बल सिक्सच्या मदतीने 30 रन्स केले. सॉल्ट-नरेननंतर व्यंकटेश अय्यरची जादू पाहायला मिळाली. व्यंकटेश अय्यरने झंझावाती अर्धशतक झळकावून आरसीबीला सामन्यातून पूर्णपणे काढून टाकले. व्यंकटेश अय्यरने 30 बॉल्समध्ये तीन फोर आणि चार सिक्सेच्या मदतीने 50 धावा केल्या.

आरसीबीची 182 रन्सची खेळी

या सामन्यात केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने केकेआरला जिंकण्यासाठी 183 रन लक्ष्य दिलं होतं. या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत 83 रन्सची नाबाद खेळी केली. टीमचा कर्णधार फाफ डुप्लेसिस आठ रन्स करून बाद झाला. यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॅमेरून ग्रीनने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 65 रन्सची भागीदारी केली. ग्रीन 21 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. 

नवव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रसेलने ग्रीनची विकेट काढली. टीमला तिसरा धक्का मॅक्सवेलच्या रूपाने बसला. तर सामन्यात रजत पाटीदार आणि अनुज रावत प्रत्येकी 3 धावा करून बाद झाले. पुन्हा एकदा पाटीदार फ्लॉप ठरला. त्याचवेळी दिनेश कार्तिकने कोहलीसोबत सहाव्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली. केकेआरकडून हर्षित राणा आणि आंद्रे रसेलने २-२ विकेट्स घेतले. तर सुनील नरीनला 1 विकेट मिळाली.

विराट कोहलीची 83 रन्सची खेळी व्यर्थ

गेल्या सामन्याप्रमाणेच विराट कोहलीने पॉवरप्लेमध्येच आपला खेळ दाखवायला सुरुवात केली. तिसऱ्याच ओव्हरमध्ये त्याने मिचेल स्टार्कच्या वेगवान बॉलवर फ्लिक केले आणि डीप मिडविकेटवर सिक्स लगावली. यानंतर उत्तम खेळी करत विराट कोहलीने कोलकाताविरुद्धचे अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 36 चेंडूत 50 धावा केल्या. याशिवाय त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो आरसीबीसाठी सर्वाधिक सिक्स मारणारा फलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत त्याने 240 सिक्स मारले आहेत. अखेरीस 83 रन्स करत कोहली नाबाद राहिला. मात्र अखेरीस केकेआरने आरसीबीचा पराभव केला.