पाहा Video : पुरुषांच्या बाथरूममध्ये 'या' भारतीय खेळाडूंना दिले जेवण

Uttar Pradesh:  टॉयलेटमध्ये खेळाडूंच जेवण ठेवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्पोर्ट्स स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये शिजवलेला भात मोठ्या थाळीत दिसत आहे.

Updated: Sep 20, 2022, 12:53 PM IST
पाहा Video : पुरुषांच्या बाथरूममध्ये  'या' भारतीय खेळाडूंना दिले जेवण title=

Food served to players inside toilet : उत्तर प्रदेशातील (UP) सहारनपूरमधून एक लाजिरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये खेळाडूंसाठी बनवलेले जेवण चक्क टॉयलेट ठेवलेले दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल (video viral) होत आहे. ज्यामध्ये स्पोर्ट्स स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये (Toilets of sports stadiums) एका मोठ्या प्लेटमध्ये शिजवलेला भात दिसत आहे. हे प्रकरण राजधानी लखनऊमध्ये पोहोचले असून तपासासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. (up cooked food kept in toilet and served to kabaddi players in saharanpur viral video sc)

कबड्डीपटूंचे जेवण टॉयलेटमध्ये ठेवले

सहारनपूर (Saharanpur) येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय 17 वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे (गिरीस कबड्डी टूर्नामेंट) आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये खेळाडूंचे भोजन तयार करून ते जलतरण तलाव संकुलातील शौचालयात ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे 200 खेळाडूंना हेच जेवण देण्यात आले. 

वाचा : जेव्हा 'त्या' 55 लहान मुलांनी सचिनला पहिल्यांदाच खेळताना पाहिलं; बातमी थेट बालपणीच्या दिवसांत नेणारी... 

कमी शिजलेले जेवण खेळाडूंना दिले

एवढेच नाही तर खेळाडूंना दिलेला भात अर्धवट शिजवूनच दिला जात होता. यासोबतच खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही चांगला नव्हता. पोहण्याच्या तलावाजवळ संपूर्ण जेवण तयार केले होते आणि डाळ, भाजी, भात कच्चा होता. या संपूर्ण प्रकरणाचा कोणीतरी व्हिडिओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 16 सप्टेंबरपासून राज्यस्तरीय कनिष्ठ मुलींच्या कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेत खाद्यपदार्थांवरून गदारोळ झाला आहे.

 

up cooked food kept in toilet and served to kabaddi players in saharanpur viral video sc