टी 20 क्रिकेटमध्ये 'या' स्टार बॅट्समनचा कारनामा, विराट कोहलीला पछाडत रेकॉर्डब्रेक

या स्टार फलंदाजाने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) रेकॉर्ड ब्रेक केला आहे.   

Updated: Oct 10, 2021, 05:14 PM IST
टी 20 क्रिकेटमध्ये 'या' स्टार बॅट्समनचा कारनामा, विराट कोहलीला पछाडत रेकॉर्डब्रेक title=

यूएई : यूएई (UAE) विरुद्ध आयर्लंड (Ireland) यांच्यात दूबईतील आयसीसी एकॅडमी स्टेडियममध्ये ( ICC Academy Ground) आज (10 ऑक्टोबर) टी 20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात यूएईने आयरलंडवर 7 विकेट्सने मात केली. यूएईने टॉस जिंकून आयर्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आयरलंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये  5 विकेट्सम गमावून 134 धावा केल्या. सलामीवीर केविन ओ ब्रायनने सर्वाधिक 54 धावा केल्या. तर पॉल स्टर्लिंगने (Paul Sterling) 40 रन्स काढल्या. (uae vs Ireland t 20 match Paul Sterling overtaking Virat Kohli and becomes 1st batsman who hit most fours in T20 cricket)
  
प्रत्युतरात यूएईने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 16.1 ओव्हरमध्ये हे विजयी आव्हान पूर्ण केलं. या सामन्यात आयर्लंडचा पराभव झाला असला, तरी त्यांचा सलामीवीर पॉल स्टर्लिंगने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडित काढला आहे. यासह पॉल हा असा कारनामा करणारा पहिलाच फलंदाज ठरलाय. 

नक्की काय रेकॉर्ड केलाय?

पॉलने यूएई विरुद्धच्या या सामन्यात 35 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने  40 धावांची खेळी उभारली. पॉलने या खेळीतील दुसरा चौकार ठोकताच विराटला सर्वाधिक चौकांराच्या बाबतीत (Most Fours in T20) मागे टाकलं.

पॉलने 89 व्या सामन्यात हा कारनामा केलाय. ताज्या आकडेवारीनुसार, आता पॉलच्या नावे 89 सामन्यांमध्ये 288 चौकारांची नोंद आहे. तर विराटने 90 मॅचेसमध्ये 284 बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेर पाठवले आहेत.