"Girlfriend ला फिरवायचंय, इतके रूपये द्या", भारतीय क्रिकेटरने लगेचच Gpay करुन टाकले

ओळख ना पाळख, 300 रूपये द्या....

Updated: Sep 29, 2022, 07:02 PM IST
"Girlfriend ला फिरवायचंय, इतके रूपये द्या", भारतीय क्रिकेटरने लगेचच Gpay करुन टाकले title=

Amit Mishra: टीम इंडियाचा (Team India) माजी खेळाडू अमित मिश्रा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतंय. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या (Road Safety World Series) सेमीफायनल मॅचमध्ये सुरेश रैनाने जबरदस्त कॅच घेतला. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या रैनाने (Suresh Raina) ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंविरुद्ध एक अप्रतिम झेल घेतल्याने शेर कभी बुढा नहीं होता, हे त्याने सिद्ध केलंय. (Twitter user asks Amit Mishra for Rs 300 to take girlfriend on date)

रैनाचा हा कॅच पाहून अमित मिश्रा (Amit Mishra) खूप प्रभावित झाला. अमित मिश्राने रैनाच्या कॅचचा व्हिडीओ ट्विटरवर (Twitter Video) शेअर करत त्याचं तोंडभरून कौतूक केलं.  "रैना भाऊ, मी तुमचं टाइम मशीन उधार घेऊ शकतो का? तुम्हाला जुन्या काळाप्रमाणे मैदानात उतरताना पाहून खूप आनंद होतो", असं मिश्रा म्हणाला. मिश्राच्या पोस्टवर एका चाहत्याने अजब मागणी केली.

मिश्रा यांनी हे ट्विट करताच, कमेंटमध्ये एका यूजरने अमित मिश्राकडे विचित्र मागणी केली. MSDIAN adi नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने अमित मिश्राला त्याच्या  Girlfriend ला फिरायला घेऊन जाण्यासाठी 300 रुपये देण्याची विनंती केली. 

ट्विटर युझरने केलेल्या मागणीनंतर Biharishaheb नावाच्या युजरने त्यांना UPI नंबर विचारला. ट्विटर वापरकर्त्याने त्याचा UPI शेअर करताच अमित मिश्राने त्याच्या खात्यात 500 रुपये ट्रान्सफर केले. युझरने 300 मागितले असताना अमित मिश्राने 500 रूपये शेअर केले आणि तुझ्या डेटसाठी शुभेच्छा असं ट्विट देखील केलं.

दरम्यान, अमित मिश्राच्या या दर्यादिलीबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

चाहते 'विराट-विराट' ओरडत होते, तेवढ्यात Anushka चा व्हिडीओ कॉल आला, Virat ने असं काही केलं की...