"2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये 'हे' खेळाडू असणार Team Indiaचे कर्णधार आणि उपकर्णधार"

" World Cup 2023 ला भारताचे कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून ही जोडी मैदानात दिसणार"

Updated: Dec 28, 2022, 09:26 PM IST
"2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये 'हे' खेळाडू असणार Team Indiaचे कर्णधार आणि उपकर्णधार" title=

Dinesh Karthik On Indian Captain : भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) असला तरी अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंना जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपआधी (World Cup 2023) कर्णधारच फिक्स नसल्याने संघबांधणी कशी करणार असे प्रश्न केले जात आहेत. विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर जवळपास डझनभर कर्णधार बदलले आहेत. श्रीलंका दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या संघामध्ये के. एल. राहुललाही उपकर्णधारपदावरून हटवलं होतं. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने (Dinesh Kartik) 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये कोण कर्णधार आणि उपकर्णधार असणार याबाबत भविष्यवाणी केली आहे. (Trending world cup 2023 rohit sharma captain & hardik pandya vice captain odi latest marathi sport news)

के. एल. राहुल (K.L. Rahul) जरी आता उपकर्णधार असला तरी हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) नेतृत्व करताना चांगले निकाल आणि नेतृत्त्व कौशल्य दाखवलं आहे. त्यामुळे वर्षभरतरी कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार म्हणून हार्दिक पंड्या जबाबदारी पार पाडू शकतो. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा कर्णधार आणि हार्दिक पंड्या उपकर्णधार असेल, असं दिनेश कार्तिकने म्हटलं आहे. 

रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये हार्दिक पंड्याने कर्णधारपदाची जबाबदारी हुशारीने सांभाळल्याचं दिसलं. गेल्या दोन वर्षामध्ये हार्दिक पंड्या एखाद्या परिपक्व खेळाडूसारखा खेळत असल्याचं दिसत आहे. याची प्रचिती म्हणजे 2022 मध्ये पंड्याने त्याच्या नेतृत्त्वाखाली पहिल्याच पर्वात गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 ची ट्रॉफी जिंकली होती. संघाला जशी गरज आहे त्यानुसार तो गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये बदल करताना दिसला. 

दरम्यान, यंदाच्या वर्ल्ड कपला काही सामने बाकी आहेत त्याआधी संघबांधणी करत एक मजबूत टीम तयार करण्याचं आव्हान निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला असणार आहे.