राजस्थान रॉयल्सची पंजाबवर मात

संजू सॅमसननं 42 चेंडूत 85 धावा केल्या.

Updated: Sep 27, 2020, 11:41 PM IST
राजस्थान रॉयल्सची पंजाबवर मात title=

शारजा : IPL 2020आयपीएलमध्ये आज रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals Vs Kings Xi Punjab) यांच्यात चांगलीच  लढत रंगली. नाणेफेक जिंकत राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने दिलेल्या 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग राजस्थाननं 4 विकेट्सने मात केली. अगदी अटीतटीच्या सामन्यात संजू सॅमसननं जबरदस्त फलंदाजी करत पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून दिला.

संजू सॅमसननं 42 चेंडूत 85 धावा केल्या. तर युवा फलंदाज अखेरच्या दोन ओव्हरमध्ये राहुल तेवातियानं जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर 30 चेंडूत 7 षटकार लगावत 53 धावा केल्या आणि आजच्या सामन्यावर आपलं नाव कोरलं.

दरम्यान पंजाब संघाच्या मयंक अग्रवालने 50 चेंडूत 106 धावांची खेळी करताना 10 चौकार आणि 7 षटकार लगावले. त्याला साथ मिळाली कर्णधार लोकेश राहुलची. आयपीएलमधलं मयांकचं हे पहिलं शतक ठरलं आहे.

संजू सॅमसन, केएल राहुल,  स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोफ्रा आर्चर या खेळडूंच्या खेळीवर समस्त क्रिकेट प्रेमींच्या नजरा होत्या. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला असल्याने दुसरा विजय कोणता संघ मिळवणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.  अखेर राजस्थान रॉयल्स संघाने विजय मिळवला.