नवी दिल्ली : आपल्या देशासाठी खेळणं हे प्रत्येकासाठी अभिमानाची बाब असते. देशाच प्रतिनिधित्व करणं ही प्रत्येक खेळाडूची इच्छा असते.
इथपर्यंत पोहोचण्यासाठी खेळाडूंना खाजगी आयुष्यात अनेक तडजोड कराव्या लागतात. आज आपण अशाच एका खेळाडूविषयी जाणून घेऊया.
टॉनी पिगॉट या खेळाडूने इंग्लंडकडून मॅच खेळण्यासाठी स्वत:चे लग्न रद्द केले. त्यानंतर तो इतिहासाचा साक्षीदार झाला.
टॉनी पिगॉट आपल्या देशासाठी केवळ एकच टेस्ट मॅच खेळला. याच खेळासाठी त्याने आपले लग्न पुढे ढकलले.
१९८४ मध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ८ रन्स बनवून बाद झाला.
बॉलींग करताना त्याने न्यूझीलंडच्या २ बॅट्समनना पॅव्हेलियन धाडले.
ही टेस्ट मॅच ऐतिहासिक ठरली कारण ती फक्त ३ दिवसात आटोपली. ११ तास आणि ४८ मिनिटेच हा खेळ चालला.
यामध्ये इंग्लडची १३२ रन्सनी हार झाली. पहिल्या डावात न्यूझीलंडने ३०७ रन्स बनविले. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील स्कोअर इंग्लंड दोन डावातही करु शकली नाही.
इंग्लंड पहिल्या डावात ८३ रन्स तर दुसऱ्या डावात ९२ रन्सच बनवू शकली. त्यामूळे न्यूझीलंडचा १३२ धावांनी विजय झाला.
न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू रिचर्ड हेडली या खेळात ९९ वर आऊट झाले. हा राग त्यांनी बॉलिंगमध्ये काढला आणि इंग्लिश बॅट्समन्सनी त्याच्यापुढे नांगी टाकली. सर हेडली यांनी पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ५ विकेट घेतले.
ही मॅच इंग्लड ऑलराऊंडर टोनी पिगॉटने लग्न रद्द केल्याने आणि रिचर्ड हेडलींच्या जबरदस्त ऑलराऊंडर प्रदर्शनामूळे लक्षात राहते.
ही मॅच आजपासून ३४ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच ५ फेब्रुवारी १९८४ ला संपली होती. त्या दिवसानंतर टोनी पिगॉट इंग्लड टीमसाठी कधी क्रिकेट खेळू नाही शकले.