12 चेंडूत 5 विकेट्स पटकावत या गोलंदाजाने रचला इतिहास!

T-10 लीगमध्ये पाच विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.

Updated: Nov 20, 2021, 02:21 PM IST
12 चेंडूत 5 विकेट्स पटकावत या गोलंदाजाने रचला इतिहास! title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मर्चंट डी लँगने अबू धाबी टी10 लीगमध्ये इतिहास रचला आहे. अबुधाबी संघाकडून खेळताना लँगने बांगला टायगर्सविरुद्ध पाच विकेट घेतल्यात. मुख्य म्हणजे त्याने या 5 विकेट्स केवळ 2 ओव्हर्समध्ये घेतल्या आहेत. T10 लीगमध्ये पाच विकेट घेणारा लँग हा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.

लँगपूर्वी आधी भारताचा फिरकीपटू प्रवीण तांबे याने 2018मध्ये पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. तांबेने सिंधीजकडून खेळताना केरळ नाईट्सविरुद्ध हॅटट्रिकसह पाच बळी घेतले. तांबेने 2 ओव्हरमध्ये केवळ 15 धावा देत हा विक्रम केला होता.

मुंबई इंडियन्सकडून खेळलाय लँग

दक्षिण आफ्रिकेचा मर्चंट डी लँग आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. आयपीएलच्या पाच सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 5 विकेट आहेत. लँगने 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केलं होतं. मात्र, त्याला फक्त दोन कसोटी, चार एकदिवसीय आणि 6 टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली. 

लँगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26 विकेट घेतल्या आहेत. T-20 क्रिकेटमध्ये या गोलंदाजाने 122 सामन्यात 141 विकेट घेतल्या आहेत.

शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात पॉल स्टर्लिंग आणि ख्रिस गेलच्या स्फोटक खेळीमुळे टीम अबुधाबीने प्रथम फलंदाजी करताना 10 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावत 145 धावा केल्या. 

स्टर्लिंगने 23 चेंडूत 59 तर ख्रिस गेलने 23 चेंडूत नाबाद 49 धावांची खेळी केली. स्टर्लिंगने आपल्या खेळीत 6 चौकार आणि पाच सिक्स मारले. तर गेलने 2 चौकार आणि 5 सिक्स मारले.