जसप्रीत बुमराहच्या प्रेमात पडली ही बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्सचं नातं अनेक वर्षांपासून जवळचं झालं आहे. काही दिवसांपूर्वीच विराट कोहली, जहीर खान, युवराज सिंग आणि हरभजन सिंगने अभिनेत्रींसोबत लग्न केलं.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 5, 2018, 09:32 AM IST
जसप्रीत बुमराहच्या प्रेमात पडली ही बॉलिवूड अभिनेत्री title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्सचं नातं अनेक वर्षांपासून जवळचं झालं आहे. काही दिवसांपूर्वीच विराट कोहली, जहीर खान, युवराज सिंग आणि हरभजन सिंगने अभिनेत्रींसोबत लग्न केलं.

बुमराहच्या प्रेमात

आता आणखी अभिनेत्रीने आपल्या हृदयातली गोष्ट बोलून दाखवली आहे. असं म्हटलं जातंय की, ही भारतीय टीमचा युवा गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या प्रेमात पडली आहे. सोशल मीडियावर ती नेहमी बुमराह बद्दल बोलत असते.

कोण आहे ती अभिनेत्री

अभिनेत्री राशी खन्ना बुमराहच्या प्रेमात पडली आहे. की फक्त त्याचेच सामने बघते. राशी दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमधलं एक मोठं नाव आहे. जिल, हायपर, बंगाल टायगर, शिवम आणि सन ऑफ सथ्यमूर्ती-2 या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये राशीने 'मद्रास कॅफे' या सिनेमामध्ये काम केलंय. जॉन इब्राहिमसोबत तिने स्क्रिन शेअर केलं.

Image result for rashi khanna zee
 
राशी क्रिकेटची चाहती आहे. ती टीम इंडियाचे ते सामने खूप आवडीने बघते ज्यामध्ये बुमराह असतो. राशीने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे. ती नेहमी सोशल मीडियावर बुमराहचं कौतूक करत असते.