Ind vs Aus: टीम इंडियाला तिसरा झटका, आता हा खेळाडू दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर

टीम इंडियाचा आणखी एक महत्त्वाचा गोलंदाज बाहेर

Updated: Jan 12, 2021, 02:47 PM IST
Ind vs Aus: टीम इंडियाला तिसरा झटका, आता हा खेळाडू दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर title=

सिडनी : टीम इंडियाला लागलेलं दुखापतींचं ग्रहण कमी होताना दिसत नाहीये. ब्रिस्बेन टेस्टपूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहनं चौथ्या टेस्टमधून माघार घेतल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. सिडनी टेस्टमध्ये बुमराहच्या ओटीपोटावर ताण आल्यानं चौथ्या टेस्टमधून माघार घेतली आहे. जर बुमराह 50 टक्के फिट झाला तर तो ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळेल अशी माहिती टीम मॅनेजमेंटनं दिली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेच्या शेवटच्या कसोटीत उतरण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघापुढे अडचणी वाढल्या आहेत. मागील चार सामन्यात भारतासाठी चांगली कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव यांच्यानंतर आता जसप्रीत बुमराहही दुखापतीमुळे भारतात परतणार आहे.

भारतीय संघासाठी, ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या मालिकेचा शेवटच्या सामन्यात गोलंदाजीच्या बाबतीत एक कठीण आव्हान असणार आहे. मोहम्मद सिराज सध्या संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. या दौर्‍यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आतापर्यंत फक्त 2 सामने खेळले आहेत. सिराजसोबत नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर हे देखील असतील. त्यांना प्रत्येकी एका कसोटीत खेळण्याचा अनुभव आहे. कसोटी सामन्यात पदार्पणानंतर शार्दुल फक्त 10 बॉलनंतर दुखापतग्रस्त झाला होता.

मागील दौर्‍यावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा ऐतिहासिक विजय झाला होता. इशांत, शमी, उमेश आणि बुमराह यांचे यात मोठे योगदान होते. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच इशांत बाहेर झाला. पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर शमी दुखापतग्रस्त झाला. मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात उमेशला दुखापत झाली. आता तिसरा सामना खेळल्यानंतर संघाचा शेवटचा अनुभवी गोलंदाज बुमराहही दुखापतीमुळे बाहेर झाला.

चार सामन्यांच्या कसोटी सामन्यात बुमराहने 21 बळी मिळवून प्रथम स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नॅथन लियॉननेही 21 विकेट घेतल्या परंतु बुमराहने अधिक चांगली गोलंदाजी केली आहे. मोहम्मद शमीने 4 सामन्यांत 16 विकेट घेतले होते. इशांतने तीन सामन्यांत 11 विकेट घेतले होते तर उमेश यादवने 1 सामन्यात 2 विकेट घेतले होते.