ऑस्ट्रेलिया : क्रिकेटच्या मैदानात फलंदाज आणि गोलंदाजांप्रमाणे महत्त्वाचं काम असतं ते अंपायर्सचं. भर मैदानाच्या आवाजत काही सेकंदांमध्ये निर्णय देणंही तितकंच कठीण आहे. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये अंपायरने एक निर्णय दिला आणि तो लगेच बदलला देखील. कारण क्षणार्धात अंपायरला त्याच्या चुकीची जाणीव झाली.
बिग बॅश लीगमध्ये रविवारी पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न स्टार यांच्यात सामना सुरु होता. यावेळी पर्थ टीमची फलंदाजी सुरु होती. त्यावेळी कर्णधार एस्टर टर्नरच्या हेल्मेटवर बॉल लागला. या दरम्यान त्याच्या बॅटला हलका बॉल लागल्याचं वाटलं. अशात अंपायर ब्रूस यांनी बोट उंचावत आऊटचा करार दिला.
गोलंदाज जैवियरसाठी ही बीबीएलमधील पहिली विकेट ठरली असती. मात्र तितक्यात अंपायरने त्याचा निर्णय बदलला आणि त्यांची चूक मान्य केली. यावेळी त्यांनी नॉटआऊट असल्याचा करारही दिला.
Xavier Crone had his first BBL wicket on debut - for all of three seconds! @KFCAustralia | #BBL11 pic.twitter.com/LDz2frhXOV
— KFC Big Bash League (@BBL) January 2, 2022
अंपायरने मैदानावर एकदम त्यांचा निर्णय बदलणं हे फार कमी पहायला मिळतं. यावेळी अंपायर ब्रूस यांनी तातडीने स्पष्ट केलं की बॉल फलंदाजाच्या हेल्मेटला लागला होता, त्यामुळे तो आऊट झाला नाहीये. दरम्यान रिप्लेमध्येही हीच गोष्ट स्पष्टपणे दिसत होती.
बीबीएलच्या या मोसमातील हा 31 वा सामना होता. ज्यामध्ये पर्थ आणि मेलबर्न आमनेसामने होते. अलीकडे बिग बॅश लीगचे काही सामने कोरोनामुळे रद्द करावे लागले होते.