IPL 2024 Final: टीमने माझ्यासाठी खूप केलं...; IPL विजयानंतर आंद्रे रसेलना अश्रू अनावर!

IPL 2024 Final: आंद्रे रसेल आयपीएल 2024 मध्ये हैदराबादसाठी धोकादायक ठरताना दिसला आहे. या सिझनमध्ये हैदराबादविरुद्धच्या साखळी फेरीच्या सामन्यात त्याने फलंदाजीमध्ये कहर केला. 

सुरभि जगदीश | Updated: May 27, 2024, 08:06 AM IST
IPL 2024 Final: टीमने माझ्यासाठी खूप केलं...; IPL विजयानंतर आंद्रे रसेलना अश्रू अनावर!

IPL 2024 Final: आयपीएलच्या 2024 म्हणजेच यंदाच्या सिझनचा अखेर शेवट झाला. यंदाच्या आयपीएलची विजेती केकेआर टीम ठरली. 10 वर्षांनंतर केकेआरच्या टीमने आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. केकेआर आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तिसरी यशस्वी टीम ठरली आहे. आयपीएल जिंकल्यानंतर अनेक खेळाडू सेलिब्रेशन करताना दिसले तर काही खेळाडू मात्र भावूक झाले होते. यावेळी कोलकात्याचा खेळाडू आंद्रे रसेल देखील भावूक झाल्याचं दिसून आलं. 

रसेलने पटकावल्या 3 विकेट्स

आंद्रे रसेल आयपीएल 2024 मध्ये हैदराबादसाठी धोकादायक ठरताना दिसला आहे. या सिझनमध्ये हैदराबादविरुद्धच्या साखळी फेरीच्या सामन्यात त्याने फलंदाजीमध्ये कहर केला. यानंतर त्याने आता फायनलच्या सामन्यात गोलंदाजीमध्ये धुमाकूळ घातला. यावेळी जेतेपदाच्या लढाईत रसेलने 3 महत्त्वाच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यामध्ये मार्कराम, अब्दुल समद आणि पॅट कमिन्स यांची विकेट त्याने पटकावली,

विजयानंतर आंद्रे रसेल झाला भावूक

सामना जिंकल्यानंतर रसेल कॅमेरासमोर भावूक झालेला दिसला. यावेळी रसेलचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. भावूक झालेल्या रसेलला त्याच्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत. यावेळी रसेलला अश्रूही अनावर झाल्याचं दिसून आलं. तो म्हणाला, 'या टीमने माझ्यासाठी खूप काही केलं आहे. याचा अर्थ माझ्यासाठी खूप काही आहे. मी अनेक वर्षांपासून या टीमसोबत आहे. अखेर आज माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. 

किंग खानकडून गौतम गंभीरचं कौतुक

कोलकात्याच्या टीमचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमला शिस्त लावली अन् अखेर आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यात सर्वात मोठा हातभार लावला. फायनल सामना (IPL Final) जिंकल्यानंतर केकेआरच्या खेळाडूंनी गौतम गंभीरला खांद्यावर उचलून घेतलं अन् जल्लोष साजरा केला. त्यावेळी केकेआरचा मालक किंग खानने देखील गंभीरचं कौतूक केलं. गौतम गंभीर समोर दिसल्यावर किंग खानने गंभीरची कडकडून गळाभेट घेतली आणि त्याच्या माथ्याचं चुंबन देखील घेतलं. त्यावेळी खेळाडूंनी देखील टाळ्या वाजवत गंभीरला यशाचं योगदान दिलं.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x