लंडन : रोहित शर्माला विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान न दिल्याबद्दल टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्टीकरण दिले आहे. हिप सर्जरीनंतर रोहितला दुखापतीतून सावरण्यासाठी काही काळ घालवावा लागणार आहे. त्यामुळे तो या सिरीजमध्ये उपलब्ध राहू शकत नाही.
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर लगेचच वेस्टइंडीजला रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारत पाच एकदिवसीय आणि एक टी -२० सामना खेळणार आहेत.
एकदिवसीय मालिका २३ जूनपासून ते ६ जुलैपर्यंत असणार आहे. तसेच एकमेव टी-२० सामना ९ जुलैला खेळवला जाणार आहे.
कोहलीने सांगितले की, रोहितला संघात यावर्षी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत असलेल्या मालिकेमध्ये खेळायचे आहे त्यामुळे वेस्टइंडीज दौऱ्यासाठी त्याला संघात सामील केले नाही.