लेकाला खेळताना पाहून सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात पाणी; बिशपने सांगितला ड्रेसिंग रूममधील किस्सा; पाहा Video

Sachin Tendulkar On Arjun:  मी पहिल्यांदा त्याला स्क्रीनवर पाहिलं, तेव्हा मला नक्कीच आनंद झाला. मी 2008 साली या संघाशी जोडलो गेलो, आता अर्जुन (Arjun Tendulkar) संघासाठी खेळतोय, असं म्हणत सचिन (Sachin Tendulkar) भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

Updated: Apr 19, 2023, 06:00 PM IST
लेकाला खेळताना पाहून सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात पाणी; बिशपने सांगितला ड्रेसिंग रूममधील किस्सा; पाहा Video title=
Tears in Sachin Tendulkar eyes after seeing Arjun playing

Ian Bishop Reveals About Sachin: गेल्या दोन हंगामापासून प्रतिक्षेत असलेल्या अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याला मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians) खेळण्याची संधी मिळाली. मुंबईचा स्टार बॉलर जॉफ्रा आर्चर जखमी असल्याने सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडूलकरला संघात सामील करण्यात आलं आहे. पहिल्या सामन्यात त्याला फक्त 2 ओव्हर मिळाल्या. त्यानंतर हैदराबादविरुद्ध अर्जुननने महत्त्वाची शेवटची ओव्हर टाकली आणि मुंबईला विजय मिळवून दिला. अशातच वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू इयान बिशप याने सचिन तेंडुलकरबाबत मोठा खुलासा केला आहे. 

हैदराबाद आणि मुंबई (SRH vs MI) यांच्यातील सामन्यात बिशप (Ian Bishop) याने कॉमेंट्री केली. त्यावेळी त्याने ड्रेसिंग रूममध्ये काय झालं? यावर खुलासा केला आहे. अर्जुन आता आयपीएल खेळत असल्याने सचिन आनंदी दिसत होता. त्यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी देखील आलं होतं, असं इयान बिशप यांनी सांगितलं. मुंबई इंडियन्सने देखील बाप लेकाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाला Sachin Tendulkar ?

मी याआधी त्याला कधी खेळताना पाहिलं नाही. माझ्यासाठी हे नवीन होतं. याआधी मी त्याला फक्त सांगितलं होतं की, जा आणि खेळ. पहिल्या सामन्यात आम्ही ड्रेसिंगरूममध्ये होतो. तेव्हा मी त्याला काहीही सांगितलं नाही. त्याच्या डोक्यात जो प्लॅन होता, त्यानुसार तो खेळला. मी पहिल्यांदा त्याला स्क्रीनवर पाहिलं, तेव्हा मला नक्कीच आनंद झाला. मी 2008 साली या संघाशी जोडलो गेलो, आता अर्जुन संघासाठी खेळतोय, असं म्हणत सचिन भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IPL (@iplt20)

दरम्यान, सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावांची गरज होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने अर्जुनवर विश्वास दाखवला. अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारची (Arjun Tendulkar First Wicket) विकेट काढली आणि हैदराबादचा डाव गुंडाळला. मी गोलंदाजीवर खूप खुश आहे, असं अर्जुनने यावेळी बोलताना सांगितलं होतं. कर्णधाराने मला केव्हाही गोलंदाजी करण्यास सांगितले तरी मी तयार होतो, असं म्हणत अर्जुनने विरोधी संघाविरूद्ध दंड थोपटले आहेत.