Rohit Sharma Crying After loss CWC 2023 : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 विकेट्सने पराभव करत टीम इंडियाचं स्वप्नभंग केलं आहे. कांगारूंनी सहाव्यांदा वर्ल्ड कप (World Cup 2023) आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने दिलेल्या 241 धावांच्या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने यशस्वीरित्या पाठलाग केला. ट्रायव्हस हेडची शतकी खेळी आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. टीम इंडियाकडून विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अर्धशतक ठोकलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलियासमोर सर्वकाही फिकं पडलं. पराभव समोर दिसत असताना प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन वाढत चाललं होतं. ऑस्ट्रेलियासाठी विजयी धाव आली अन् भारतीय खेळाडूंच्या (Rohit Sharma Heartbreaking Video) डोळ्यात पाणी आलं.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विजयानंतर मैदानात धाव घेतली अन् टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला अश्रू अनावर झाले. सर्वांसमोर रडूनही जमणार नव्हतं पण अश्रूंना वाट मोकळी करण्याची गरज होती. पराभवानंतर रोहितने हातमिळवणी केली अन् ड्रेसिंग रुमकडे वाट धरली. त्याच्या चेहऱ्यावर पराभवाचं दु:ख साफ दिसत होतं. ड्रेसिंग रुमकडे जाताना पावलं जड होत होती, कारण रोहितसाठी हा शेवटचा वर्ल्ड कप होता. ड्रेसिंग रुममध्ये जाताना रोहितला भावना अनावर झाल्या अन् ड्रेसिंगमध्ये जाताना रोहितच्या डोळ्यात पाणी आलं.
Missing out in 2011, and now, 12 years later, giving it his all as captain. It's tough how time and chances align. If this is indeed his last World Cup, he's left an indelible mark. Salute to the captain!
Feel for Rohit Sharma pic.twitter.com/rixJGeBgGp— Ambuj Kumar Pandey (@CricCryptAmbuj) November 19, 2023
वर्ल्ड कप जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला फक्त 2 धावांची गरज होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल मैदानात होता. मॅक्सवेलला टोला लगावला अन् दोन धावा पळून काढल्या. सामना मगावल्याचं कळताच केएल राहुल याच्या पायाखालची जमिन कोळली तो खाली बसला तर दुसरीकडे मोहम्मद सिराजला बॉलिंग करत असताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. जसप्रित बुमराहने मोहम्मद सिराजला सावरण्यासाठी पुढाकार घेतला.